Cricket Stadium नंतर आता गुजरातमधील मेडिकल कॉलेजला देण्यात येणार पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव
अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन (Ahmedabad Municipal Corporation AMC) ने मणिनगर (Maninagar) येथील मेडिकल कॉलेजला नरेंद्र मोदी यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे.
गुजरात (Gujarat) मधील क्रिकेट स्टेडियमला 'नरेंद्र मोदी' (Narendra Modi) असे नाव दिल्यावर आता मेडिकल कॉलेजही (Medical College) पंतप्रधानांच्या नावाशी जोडण्याची तयारी सुरू आहे. अहमदाबाद म्युनिसिपल कॉर्पोरेशन (Ahmedabad Municipal Corporation AMC) ने मणिनगर (Maninagar) येथील मेडिकल कॉलेजला नरेंद्र मोदी यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या AMC स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
एएमसी एमईटी मेडिकल कॉलेज 'एएमसी मेडिकल एज्युकेशन ट्रस्ट' द्वारे चालवले जाते. जे एलजी हॉस्पिटल कंपाऊंडमध्ये आहे. या नामांकनाची पुष्टी करताना, महापालिका स्थायी समितीचे अध्यक्ष हितेश बरोत म्हणाले, “आता एएमसी संचालित एलजी कॉलेज कॅम्पसमधील एएमसी एमईटी मेडिकल कॉलेजचे नाव ‘नरेंद्र मोदी मेडिकल कॉलेज’ असे असेल." (हेही वाचा -SCO Summit: सामायिक मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण करण्यासाठी मी उत्सुक आहे, उझबेकिस्तानला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी दिली प्रतिक्रिया)
सध्या मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस आणि पोस्ट ग्रॅज्युएट (पीजी) अभ्यासक्रम चालवले जातात. मुख्यमंत्री असताना या महाविद्यालयाची कल्पना नरेंद्र मोदी यांनीच केल्याचे बोलले जाते. 2009 मध्ये त्यांनी त्याचे उद्घाटन केले. तेव्हा त्यात 150 जागा होत्या. आता एमबीबीएससाठी 220 जागा आणि MD/MS साठी 170 जागा आहेत.
दरम्यान, 14 सप्टेंबर रोजी AMC MET च्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. कॉलेजला नरेंद्र मोदी मेडिकल कॉलेज असे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर हा निर्णय एएमसीच्या स्थायी समितीकडे पाठवण्यात आला. पीएम मोदी 11 वर्षांहून अधिक काळ मणिनगर विधानसभा मतदारसंघातून आमदार आहेत.
दरम्यान, गुजरातचे मुख्यमंत्री झाल्यानंतर मोदींनी डिसेंबर 2002 मध्ये पहिल्यांदा येथून निवडणूक लढवली आणि जिंकली. गुजरातमध्ये काही महिन्यांनी विधानसभा निवडणुका होणार आहेत अशा वेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या नामकरणावरूनही राजकारण तापू शकते, असे मानले जात आहे. स्टेडियमला पीएम मोदींचे नाव दिल्याने भाजपला विरोधकांच्या टीकेला सामोरे जावे लागले होते.