लज्जास्पद! 58 वर्षीय गतीमंद महिलेवर बलात्कार केल्यानंतर आरोपीने पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये घुसवला लोखंडी रॉड
Rape | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

छत्तीसगड (Chhattisgarh) मध्ये मानसिक रुग्ण असलेल्या महिलेसोबत अत्यंत लज्जास्पद घटना घडली आहे. या महिलेवर बलात्कार केल्यानंतर आरोपीने पीडितेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये रॉड घुसवला. ही घटना छत्तीसगडमधील जांजगीर-चांपा येथे घडली. यानंतर महिलेचा मृत्यू झाला आहे. या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. बुधवारी एक महिला रस्त्यावर अत्यंत वाईट अवस्थेत रस्त्यावर आढळून आली. तिच्या शरीरावर जखमांच्या अनेक खुणा होत्या. स्थानिकांनी तिला सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

पोलिसांनी 58 वर्षीय महिलेचा मृत्यू अपघाती गृहीत धरून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये महिलेवर अत्याचार झाल्याचे उघड झाले. डॉक्टरांनी सांगितले की, महिलेवर केवळ क्रूरपणे हल्लाच झाला नसून तिच्यावर बलात्कारासारखा क्रूर प्रकार घडला आहे. (हेही वाचा - Beating: प्रेयसीला भेटण्यासाठी गेलेल्या तरुणासह 2 मित्रांना तरुणीच्या गावकऱ्यांकडून बेदम मारहाण, 5 जण अटकेत)

यानंतर पोलिसांनी त्यांच्या तपासाची दिशा बदलली आणि परिसरातील अनेक सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केले. एका फुटेजमध्ये एक व्यक्ती वृद्ध महिलेला ओढून नेताना दिसत आहे. त्यानंतर पोलिसांनी स्थानिक लोकांकडून तरुणांची माहिती गोळा केली. काही वेळातच या तरुणाचे नाव किशन यादव असल्याचे समोर आले.

पोलिसांनी त्वरीत किशन यादवचा शोध सुरू केला आणि अखेरीस त्याला अटक केली. अटकेनंतर किशन यादवने पोलिसांना सांगितले की, त्याने गतीमंद महिलेला जबरदस्तीने आपल्यासोबत ओढले आणि निर्जन ठिकाणी तिच्यावर बलात्कार केला. किशनच्या म्हणण्यानुसार, महिलेने त्याला विरोध करून ढकलले तेव्हा त्याने महिलेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लोखंडी रॉड घुसवला.

एवढं सगळं होऊनही किशनची क्रूरता संपली नाही. त्याने महिलेला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली आणि नंतर डोक्यात दगड घातला. आरोपी किशन यादवला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले आणि त्याची रवानगी कारागृहात केली आहे.