Shraddha Murder Case: हत्येनंतर काही दिवसांनीचं आफताबने बनवली दुसरी गर्लफ्रेंड; भेट म्हणून दिली श्रद्धाची अंगठी
वृत्तसंस्था एएनआयने दिल्ली पोलिसांच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, श्रद्धाच्या हत्येनंतर काही दिवसांनी आफताबने (Aftab) आणखी एक गर्लफ्रेंड (Girlfriend) बनवली होती.
Shraddha Murder Case: श्रद्धा हत्याकांडात (Shraddha Murder Case) दिल्ली पोलिसांना (Delhi Police) मोठे यश मिळाले आहे. सोमवारी पोलिसांनी श्रद्धाच्या हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त केल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिल्ली पोलिसांच्या सूत्रांच्या हवाल्याने सांगितले की, श्रद्धाच्या हत्येनंतर काही दिवसांनी आफताबने (Aftab) आणखी एक गर्लफ्रेंड (Girlfriend) बनवली होती. जिच्यासोबत तो त्याच्या रुमवर आला होता. आफताबने त्याच्या नवीन गर्लफ्रेंडला श्रद्धाची अंगठी भेट दिली. दिल्ली पोलिसांनी ती अंगठीही जप्त केली आहे.
डेटिंग अॅपवर बनवली दुसरी गर्लफ्रेंड -
मुंबईतील श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी तिचा लिव्ह-इन पार्टनर आफताबला 12 नोव्हेंबरला ताब्यात घेतले होते. दिल्लीच्या मेहरौलीमध्ये श्रद्धाच्या हत्येनंतर काही दिवसांनी आफताबने त्याच डेटिंग अॅपवरून दुसरी गर्लफ्रेंड बनवली ज्याद्वारे तो श्रद्धा वालकरला भेटला होता. डेटिंग अॅपवर मैत्री झाल्यानंतर ती तरुणीही आफताबच्या खोलीत आली. पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे की, यावेळी श्रद्धाच्या मृतदेहाचे तुकडे फ्रीजमध्ये आणि घराच्या वेगवेगळ्या भागात होते. (हेही वाचा - Shraddha Murder Case: दिल्ली पोलिसांसमोर नवे आव्हान; 26 नोव्हेंबरपर्यंत कराव्या लागणार आफताबच्या सर्व चाचण्या)
आफताब सध्या तिहार तुरुंगात बंद आहे. सोमवारी त्याला तिहार तुरुंगातून पॉलीग्राफ चाचणीसाठी रोहिणी येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये (एफएसएल) आणण्यात आले. आफताबच्या आतापर्यंत 3 पॉलीग्राफ चाचण्या झाल्या आहेत. तत्पूर्वी, शुक्रवारी त्यांची शेवटची चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये तापामुळे चाचणी प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. (हेही वाचा - Shraddha Murder Case: दोन वर्षांपूर्वी Aaftab ने श्रद्धाला केलं होतं रुग्णालयात दाखल; मुंबईतील डॉक्टरांचा खुलासा)
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रद्धाचे वडील मदन विकास वालकर यांचा डीएनए जंगलात सापडलेल्या हाडांशी जुळला आहे. यानंतर दिल्ली पोलिसांचा तपास आणखी वाढला आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. तज्ज्ञांच्या मते, हाड किंवा जुन्या रक्ताच्या डागांशी डीएनए जुळल्यास आफताबविरुद्ध महत्त्वाचे पुरावे दिल्ली पोलिसांना मिळू शकतात.