Andhra Pradesh: अभिनेत्री कादंबरी जेठवानी यांना पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक, तीन अधिकारी निलंबित
अभिनेत्री कादंबरीने तिच्यावर छळ झाल्याचा आरोप केला होता. या घटनेनंतर सरकारने कायदेशी चौकशी केली होती.
Andhra Pradesh: मुंबईतील मॉडेल आणि अभिनेत्री कादंबरी जेठवानी हीचा छळ केल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकराने तीन आयपीएस अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. अभिनेत्री कादंबरीने तिच्यावर छळ झाल्याचा आरोप केला होता. या घटनेनंतर सरकारने कायदेशी चौकशी केली होती. चौकशीनंतर तीन अधिकाऱ्यांना पद गमावावे लागले आहे. (हेही वाचा- वडिल मुख्याध्यापक असलेल्या शाळेत मुलाचा बेकायदेशीर सहभाग; दोघांविरोधात गुन्हा दाखल)
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईस्थित अभिनेत्री कादंबरी जेठवानी हीनं छळ झाल्याचा आरोप केला होता. या आरोपाखाली आंध्र प्रदेश सरकराने माजी गुप्तचर प्रमुख पी, सीताराम अंजनेयुलू, माजी विजयवाडा पोलिस आयुक्त क्रांती राणा टाटा आणि माजी पोलिस उपायुक्त विशाल गुन्नी अधीक्षक दर्जा यांना पदावरून निलंबित केले आहे. अभिनेत्रीने तक्रार केली आणि त्यानंतर आंध्र प्रदेश सरकाने ही कायदेशीर कारवाई केली.
अभिनेत्रीने आरोप केला की,
अभिनेत्री कांदबरी हीनं तक्रार केली की, पोलिस अधिकाऱ्यांनी योग्य तपास न करता त्यांना चुकीच्या पध्दतीने अटक केले. अभिनेत्रीने पुढे आरोप केला की, पोलिसांकडून वृध्द आई वडिलांना अपमान सहन करावा लागला. वायएसआरसीपी नेते केव्हीआर विद्या सागर यांनी केलेल्या तक्रारीवरून तिच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केल्याप्रकरणी तीन पोलीस अधिका-यांनी आणि काही खालच्या दर्जाच्या अधिका-यांनी कादंबरी आणि तिच्या कुटुंबाचा छळ केला.