Acid Attack In Rajastan: लग्न करण्यास नकार दिल्याने तरुणीवर फेकला अॅसिड, आरोपीला अटक

राजस्थान पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे.

Acid Attack Representational Image (File Photo)

Acid Attack In Rajastan: राजस्थान येथील अजमेरमध्ये एका तरुणीवर अॅसिड फेकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजस्थान पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. पीडित तरुणीने आरोपीला लग्नाला नकार दिल्याने असं कृत्य केल्याचे समोर आले आहे. संजना असं पीडित तरुणीचे नाव आहे. ती आशागंज भागातील रहिवासी आहे. रामगंज पोलिस ठाण्यात याप्रकरणी तक्रार नोंदवला आहे. या घटनेनंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. बुधवारी सकाळी आरोपी तरुणीच्या घरी गेला आणि तिला लग्नासाठी दबाब टाकत होता. अनेकदा तिनं नकार दिल्याने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. (हेही वाचा-अकोलेत जमावाच्या मारहाणीत हत्येच्या गुन्ह्यातील आरोपीचा मृत्यू)

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आजीसोबत घरी एकटी राहत होती. बुधवारी सकाळी आरोपी तिच्या घरी आला आणि तिला लग्नासाठी विचारणा केली.पीडित तरुणीने अनेकदा नकार दिल्याने आरोपीचे मन दुखावले. राग अनावर न झाल्याने आरोपीने पीडितेच्या चेहऱ्यावर अॅसिड फेकले आणि घटनास्थळावरून आरोपी फरार झाला. चेहऱ्यावर अॅसिड पडल्याने पीडित मुलगी वेदनेने ओरडत बाहेर आली. दरम्यान आरोपीने अॅसिडची बाटली घराबाहेरील नाल्यात फेकली.

तरुणीचा आवाज ऐकूना नागरिक जमा झाले आणि तीला रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी पीडितेच्या शेजारी राहायचा. आरोपीचे पीडित तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. पीडित १० टक्के भाजली असल्याची माहिती मिळाली आहे. सद्या रुग्णालयात तीच्यावर उपचार सुरु आहे. पोलिसांनी अवघ्या दोन तासांत आरोपीला अटक केले आहे. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.