House Collapse In Delhi: दिल्ली येथे मुसळधार पाऊस, झाकिरा उड्डाणपुल परिसरात इमारत कोसळली; मदत आणि बचाव कार्य सुरु
अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, सकाळच्या सुमारास फोनवर घटनेची माहिती मिळाली.
देशाची राजधानी दिल्लीत मुसळधार पावसामुळे, रविवारी सकाळी उत्तर दिल्लीतील झाखिरा उड्डाणपुलाजवळ एक घर अचानक कोसळले, ज्यामध्ये तीन जण अडकले, तथापि, त्यापैकी दोघांना वाचवण्यात यश आले असून एकाचा शोध सुरू आहे. अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार, सकाळच्या सुमारास फोनवर घटनेची माहिती मिळाली. झाखिरा उड्डाणपुलाजवळील मच्छी मार्केटमध्ये एक घर कोसळले असून, त्यात तीन जण अडकल्याचे माहिती देणाऱ्याने सांगितले. कॉल मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या आहेत. अपघाताबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, हे टिन शेडचे घर होते जे पावसात कोसळले.अधिकारी म्हणाले, दोन जणांना बाहेर काढून रुग्णालयात नेण्यात आले आहे, तिसऱ्याचा शोध सुरू आहे. (हेही वाचा - Wall Collapsed In Delhi: दिल्लीतील देशबंधू कॉलेजच्या भिंतीची काही भाग कोसळला, अनेक कारचे नुकसान)
राजधानी दिल्लीतील मुसळधार पाऊस पाहून केजरीवाल अॅक्शनमध्ये आले आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांनी रविवारी सर्व सरकारी अधिकाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्या रद्द केल्या आणि त्यांना त्यांच्या संबंधित पावसाने प्रभावित क्षेत्राची पाहणी करण्याचे निर्देश दिले. केजरीवाल यांनी ट्विट केले की, "दिल्लीत काल 126 मिमी पाऊस पडला. एकूण मान्सूनपैकी केवळ 15 टक्के पाऊस 12 तासांत झाला.
त्यात पुढे लिहिले आहे की, पाणी साचल्यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. आज दिल्लीचे सर्व मंत्री आणि महापौर समस्याग्रस्त भागांची पाहणी करतील. सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना रविवारची सुट्टी रद्द करून पाहणीसाठी मैदानावर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.