Mahesh Khinchi Wins Delhi Mayor Election: दिल्ली महापौरपदाच्या निवडणुकीत आपचे महेश खिंची विजयी; भाजपच्या उमेदवाराचा अवघ्या 3 मतांनी पराभव

महेश खिंची यांना एकूण 265 मते पडली. त्यापैकी 2 अवैध ठरले. खिंची यांना 133 तर भाजपचे प्रतिस्पर्धी किशन लाल यांना 130 मते मिळाली.

Mahesh Khinchi wins Delhi Mayoral election (फोटो सौजन्य - PTI)

Mahesh Khinchi Wins Delhi Mayor Election: दिल्ली महापौरपदाच्या निवडणुकीत (Delhi Mayoral Election 2024) आम आदमी पक्षाचे नेते महेश खिंची (Mahesh Khinchi) विजयी झाले आहेत. खिंची हे भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत दिल्लीचे महापौर (Mayor) बनले आहेत. महेश खिंची यांना एकूण 265 मते पडली. त्यापैकी 2 अवैध ठरले. खिंची यांना 133 तर भाजपचे प्रतिस्पर्धी किशन लाल यांना 130 मते मिळाली.

विशेष म्हणजे भाजपकडे केवळ 120 मते होती. असे असतानाही भाजपला आणखी 10 मते मिळाली. याचा अर्थ आम आदमी पक्षाच्या दहा नगरसेवकांनी भाजपच्या बाजूने क्रॉस व्होट केले. तसेच आम आदमी पक्षाकडे 142 मते होती, ज्यात तीन राज्यसभा खासदार, 13 आमदार आणि 126 नगरसेवकांचा समावेश आहे. (हेही वाचा - Delhi Air Quality Plummets: दिल्ली शहराची हवा गुणवत्ता घसरली, धुक्याने व्यापली राजधानी; विमान, रस्ते वाहतूक विस्कळीत)

46 वर्षीय खिंची करोलबागच्या देव नगर वॉर्डातून 'आप'चे नगरसेवक आहेत. पीठासीन अधिकारी सत्य शर्मा यांच्या देखरेखीखाली दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास या पदासाठी मतदानाला सुरुवात झाली. महापौर झाल्यानंतर महेश खिंची यांनी सांगितलं की, 'अरविंद केजरीवाल यांनी ज्या पद्धतीने दिल्लीतील जनतेसाठी काम केले, तसेच मी देखील काम करतील. शहराच्या स्वच्छतेसाठी काम करण्याला माझे प्राधान्य असेल. आम्ही दिल्लीतील लोकांसाठी काम करू.' (हेही वाचा -Road Like Hema Malini's Cheeks: 'दिल्लीतील रस्ते हे हेमा मालिनी यांच्या गालासारखे...'; आप आमदाराच्या वक्तव्यावर भाजप आक्रमक, कारवाईची मागणी)

दरम्यान, मतदानापूर्वी काँग्रेसच्या नगरसेवकांनी 'आप'च्या महापौरांवर दलितांचे हक्क डावलल्याचा आरोप करत सभागृहात गोंधळ घातला. काँग्रेस नगरसेवकांनी 'केजरीवाल दलितविरोधी' अशा घोषणा दिल्या. काँग्रेसच्या सर्व 8 नगरसेवकांनी सभागृहातून सभात्याग केला. काँग्रेसचे सात नगरसेवक आणि स्वाती मालीवाल यांच्यासह एकूण आठ जणांनी मतदान केले नाही. स्वाती मालीवाल भारताबाहेर असल्याने त्यांनी मतदान केले नाही.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif