Biggest Foodie on Zomato: दिल्लीतील तरुणाने झोमॅटो अॅपवरून वर्षभरात दिल्या 3330 वेळा जेवणाच्या ऑर्डर्स; प्रतिक्रिया देताना कंपनी म्हणाली, 'देशातील सर्वात मोठा Foodie'

म्हणजे दररोज त्याने सरासरी 9 ऑर्डर दिल्या. त्यांच्या अन्नावरील प्रेमामुळे झोमॅटोने त्यांच्या वार्षिक अहवालात त्याला 'द नेशन्स बिगेस्ट फूडी' ही पदवी देऊन सन्मानित केले.

Zomato (Photo Credits: IANS)

Biggest Foodie on Zomato: अलीकडेच स्विगीने (Swiggy) आपला वार्षिक अहवाल जारी केला होता. कंपनीने आपला संपूर्ण डेटा शेअर केला होता. आता झोमॅटोने (Zomato) आपला वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला आहे, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी बिर्याणी ही टॉप डिश राहिली. याशिवाय झोमॅटोने एका वर्षात झोमॅटोकडून सर्वाधिक वेळा ऑर्डर करणाऱ्या व्यक्तीचे नावही जाहीर केले. Zomato ने त्या व्यक्तीला एक शीर्षक देखील दिले आहे.

दिल्लीच्या व्यक्तीने दिल्या 3,330 ऑर्डर -

दिल्लीतील रहिवासी असलेल्या अंकुरने 2022 मध्ये झोमॅटोला 3,330 ऑर्डर दिल्या. म्हणजे दररोज त्याने सरासरी 9 ऑर्डर दिल्या. त्यांच्या अन्नावरील प्रेमामुळे झोमॅटोने त्यांच्या वार्षिक अहवालात त्याला 'द नेशन्स बिगेस्ट फूडी' ही पदवी देऊन सन्मानित केले. (हेही वाचा - Zomato चे संस्थापक Deepinder Goyal यांनी लाल टी-शर्ट परिधान करून अनेकवेळा केली फूड डिलिव्हरी; एकाही ग्राहकाने ओळखले नाही)

रिपोर्टमध्ये झोमॅटोने कोणत्या शहराने फूड डिलिव्हरी अॅपच्या प्रोमो कोडचा सर्वाधिक फायदा घेतला हे देखील सांगितले आहे. त्यांच्या अहवालानुसार, पश्चिम बंगालमधील रायगंजने सर्वाधिक प्रोमो कोड वापरला गेला. 99.7% ऑर्डरवर प्रोमो कोड लागू होता. यासोबतच कंपनीने सूट वापरून लाखो रुपयांची बचत करणारी व्यक्ती कोण होती हेही सांगितलं आहे. मुंबईतील एका व्यक्तीने एका वर्षात 2.4 लाख रुपये वाचवले आहेत. (हेही वाचा - Most Ordered Food 2022 on Swiggy: यंदा 'ही' डिश सर्वाधिक ऑर्डर केली गेली; एका मिनिटाला कंपनीला मिळाल्या 137 ऑर्डर, स्विगीने जाहीर केला रिपोर्ट)

यावर्शी झोमॅटोवर सर्वाधिक बिर्याणी या डिशची ऑर्डर केली गेली. 2022 मध्ये अॅपला प्रति मिनिट 186 बिर्याणी ऑर्डर मिळाल्या. बिर्याणीनंतर दुसरी डिश होती पिझ्झा. यंदा दर मिनिटाला 139 पिझ्झाची ऑर्डर देण्यात आली.