अबब! बटाटे काढण्यासाठी गेलेल्या महिलेला शेतात सापडली सोन्याची नाणी; 27 हजार रुपयांना विकलं एक नाणं; नेमकं काय आहे प्रकरण? जाणून घ्या

गिरधर बाराव गावातील घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी या परिसराला बॅरिकेडिंगद्वारे वेढा घातला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने पुरातत्व विभागाच्या पथकाला याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Ancient Gold Coins Representation image (PC - pixabay)

Ancient Gold Coins Found in Buxar District: तुम्हाला शेतात काम करताना सोन्याची नाणी (Gold Coins) सापडली तर? तुम्ही म्हणालं हे कसं शक्य आहे. मात्र, बक्सर जिल्ह्यात (Buxar District) अशीचं एक घटना समोर आली आहे. बक्सरच्या सोनबरसा पोलीस स्टेशन ओपी परिसरातील गिरधर बाराव गावात बटाट्याच्या शेतात काम करताना एका महिलेला प्राचीन सोन्याची नाणी सापडली आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, महिला शेतात काम करत होती. दरम्यान, उत्खननाच्या वेळी तिला प्रथम सोन्याचे एक नाणे सापडले. त्यानंतर तिने आणखी उत्खनन केले असता आणखी 2 नाणी सापडली. शेतात सोन्याची नाणी सापडल्याची बातमी गावात पसरताचं सर्व गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली. यादरम्यान उत्खननादरम्यान आणखी एका व्यक्तीला सोन्याचे नाणे सापडले. (हेही वाचा - SBI ने ग्राहकांना केलं अलर्ट! पैशासाठी QR कोड स्कॅन करू नका, अन्यथा होईल मोठ नुकसान)

दरम्यान, या प्रकरणाची परिसरात एवढी चर्चा झाली की हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून महिला आणि पुरुषाकडून 3 नाणी जप्त केली. तसेच एका मुलाने महिलेकडून 27 हजार रुपयांना एक नाणे विकत असल्याचेही समोर आले आहे. यावरून हे नाणे सोन्याचे असल्याचं बोललं जात आहे.

गिरधर बाराव गावातील घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी या परिसराला बॅरिकेडिंगद्वारे वेढा घातला असून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मदतीने पुरातत्व विभागाच्या पथकाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. गावातील लोकांना शेतापासून दूर ठेवले जात असून, शेतात प्राचीन सोन्याची नाणी मिळण्याचे रहस्य काय आहे, याचा शोध घेतला जात आहे.

या गावात ज्या शेतातून प्राचीन सोन्याची नाणी सापडली ते शेत फार काळ नापीक होते, असे स्थानिक लोकांनी सांगितले. मात्र, यावेळी गावातील एका व्यक्तीने त्या शेतात बटाट्याची लागवड केली होती. गावातील महिला बटाटे काढण्यासाठी शेतात काम करत होत्या. यादरम्यान उत्खननात एका महिलेला सोन्याचे नाणे सापडले. त्यानंतर परिसरात खळबळ उडाली. या शेतात हे प्राचीन सोन्याचे नाणे कोठून आले याचा तपास करण्यात येत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif