Bomb Explosion In Hostel Room: अलाहाबाद विद्यापीठात वसतिगृहाच्या खोलीत बॉम्ब बनवताना स्फोट; विद्यार्थी जखमी
या घटनेत आणखी एका विद्यार्थ्याला किरकोळ दुखापत झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी लवकरच प्रभात यादवविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असे राजेश कुमार यादव यांनी सांगितले आहे.
Bomb Explosion In Hostel Room: अलाहाबाद विद्यापीठातून (Allahabad University) अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यापीठातील एक विद्यार्थी त्याच्या वसतिगृहाच्या खोलीत बॉम्ब बनवत असताना त्याच्या हातात स्फोट (Bomb Explosion) झाला. या घटनेत विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. बुधवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. विद्यार्थी हा बॉम्ब का बनवत होता? हे अद्याप समजू शकलेले नाही.
प्रभात यादव असं या विद्यार्थ्याच नाव आहे. सहायक पोलिस आयुक्त (शिवकुटी) राजेश कुमार यादव यांनी सांगितले की, अलाहाबाद विद्यापीठाचा एमएचा विद्यार्थी प्रभात यादव हा पीसी बॅनर्जी वसतिगृहातील त्याच्या खोलीत बॉम्ब बनवत होता. यादरम्यान त्याच्या हातात स्फोट झाला. या घटनेत प्रभातच्या उजव्या हाताला गंभीर दुखापत झाली. (हेही वाचा -Pune Bomb Blast Case: 2012 मधील पुणे साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपीला मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर)
दरम्यान, प्रभातला जखमी अवस्थेत एसआरएन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत आणखी एका विद्यार्थ्याला किरकोळ दुखापत झाल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. याप्रकरणी लवकरच प्रभात यादवविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येईल, असे राजेश कुमार यादव यांनी सांगितले आहे.(हेही वाचा - Ghana Explosion: घानामध्ये स्फोटकांनी भरलेल्या ट्रकच्या स्फोटात 17 ठार, 59 जखमी)
तथापी, दुसऱ्या एका घटनेत बुधवारी शाहपूर गाडा गावाजवळील फायरिंग रेंजमध्ये पडलेला लष्करी बॉम्बचा स्फोट झाल्याने एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. आर्मी फायरिंग रेंजजवळ राहणारा हनीफ आपल्या म्हशी चरण्यासाठी जंगलात गेला होता. तिथे निकामी झालेला लष्करी बॉम्ब सापडला. त्याने तो उचलला.
हनीफने त्यातील पितळ बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तेव्हा बॉम्बचा स्फोट झाला. या घटनेत हनीफ आणि त्याच्या जवळ असलेल्या एका म्हैशीचा मृत्यू झाला. हनिफचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.