COVID19 Tests In Single Day: भारताने कोविड 19 च्या दैनंदिन चाचण्यांमध्ये आज नवीन उच्चांक; एकाचं दिवसात 9,18,470 चाचण्या

देशात एकाचं दिवसात 9 लाखाहून अधिक कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत 9 लाख 18 हजार 470 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे देशातील एकूण चाचण्यांची संख्या 3.25 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.

Coronavirus (Photo Credits: Pixabay)

COVID19 Tests In Single Day: भारताने कोविडच्या दैनंदिन चाचण्यांमध्ये आज एक नवीन उच्चांक नोंदवला आहे. देशात एकाचं दिवसात 9 लाखाहून अधिक कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत. गेल्या 24 तासांत 9 लाख 18 हजार 470 कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे देशातील एकूण चाचण्यांची संख्या 3.25 कोटींपेक्षा जास्त झाली आहे. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.

दरम्यान, देशभरातल्या विस्तारित निदान प्रयोगशाळा आणि चाचणी सुलभ करण्यासाठी प्रभावी उपाययोजनांमुळे सध्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. या केंद्रित कामगिरीमुळे प्रति 10 लाख लोकसंख्येमागे चाचण्यांची (टीपीएम) संख्या झपाट्याने वाढून 23 हजार 668 झाली आहे. ही टीपीएमची संख्या सातत्याने वाढत आहे. (हेही वाचा - Coronavirus in India: देशातील कोरोना बाधितांचा आकडा 28,36,926 वर; मागील 24 तासांत 69,652 नव्या रुग्णांची मोठी भर)

कोरोना चाचण्यात नियमितपणे वाढ झाल्याने बाधित रुग्णांच्या दरात कमालीची घट झाली आहे. मोठ्या संख्येने चाचण्या घेण्यात आल्यामुळे सुरुवातीला बाधित रुग्णांचा दर वाढेल. परंतु, अनेक राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या अनुभवातून स्पष्ट झाले आहे की, त्वरित अलगीकरण, प्रभावी शोधकार्य आणि वेळेवर व्यवस्थापन यासारख्या इतर उपायांमुळे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होईल.

कोरोनाचं निदान करणाऱ्या प्रयोगशाळांच्या राष्ट्रीय नेटवर्कमध्येही सातत्याने वाढ होत आहे. सध्या सरकारी क्षेत्रात 977 प्रयोगशाळा आणि 517 खासगी प्रयोगशाळा आहेत. दरम्यान, मागील 24 तासांत देशात 69,652 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 977 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या वाढीमुळे देशातील कोरोना बाधितांचा आकडा 28,36,926 इतकी झाली आहे.