Andhra Pradesh: पोलिस कर्मचाऱ्यावर काठीने हल्ला, आरोपीवर गुन्हा दाखल, घटनेचा व्हिडिओ व्हायरल
साधुपेता सेंटर जवळ ही घटना घडली आहे. ही घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यात एका व्यक्तीने पोलिस कर्मचाऱ्यावर हल्ला केला आहे. साधुपेता सेंटर जवळ ही घटना घडली आहे. ही घटना परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लथ्थू कांदिली असं आरोपीचे नाव आहे. पोलिसांच्या तपासात असे दिसून आले की, कांदिली हा मनोरोग्ण आहे. जेव्हा तो पोलिस गणवेशात एखाद्याला पाहतो त्यावेळी त्याला मनोरोग्णाचे झटके येतात. या प्रकरणी तपासणी सुरु आहे.(हेही वाचा- धक्कादायक! ग्वाल्हेरमध्ये चालत्या कारमध्ये 13 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार; आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल)
व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, पोलिस गणवेशात असलेल्या कर्मचाऱ्यांवर एका व्यक्तीने काठीने हल्ला केला. या हल्ल्यात ते जखमी झाले. हल्ला झाल्या नंतर दुसऱ्या पोलिस कर्मचाऱ्याने पीडितेला वाचवले. स्वामी दास असं पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. जखमीला तातडीने गुडूर एरिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला प्रगत वैदयकिय उपचारांसाठी तिरुपती येथे हलविण्यात आले.
या प्रकरणी पोलिस पुढील तपासणी करत आहे. पोलिस या प्रकरणी कारवाई करत आहे. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.