Rajastan Shocker: मैत्री नाकारली म्हणून अल्पवयीन मुलीची रेल्वे समोर ढकलून केली हत्या, आरोपीला अटक

राजस्थानच्या उदयपूरमध्ये फ्रेंडशिप डेच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी 15 वर्षीय मुलीची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. मुलगी घरातून बेपत्ता होती त्यानंतर तीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

Railway Station ( Photo Credit -Wikimedia Commons)

 Rajastan Shocker: राजस्थानच्या उदयपूरमध्ये फ्रेंडशिप डेच्या दिवशी एक धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी 15 वर्षीय मुलीची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. मुलगी घरातून बेपत्ता होती त्यानंतर तीच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर मुलीचा मृतदेह सापडला. पोलिसांनी आरोपीची चौकशी केली. त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. (हेही वाचा- उत्तर प्रदेशात सीरियल किलरने 14 महिन्यात 9 महिलांची एकाच पद्धतीने हत्या; बरेली ग्रामीण भागात दहशत

मिळालेल्या माहितीनुसार, 15 वर्षाची मुलीने आरोपीशी मैत्री करणे नाकारली त्यामुळे हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. मुलगी रविवारी कॅम्प्यूटर क्लास असल्याचे कारण देऊन घरातून बाहेर पडली होती. बराच वेळ ती घरी परतली नाही त्यामुळे वडिलांनी तीचा शोध घेतला. परंतु कोणतीही माहिती समोर न आल्याने पोलिस ठाण्यात घटनेची माहिती दिली.

मृतदेह आढळला

पोलिसांनी मुलीचा शोध घेतला. रात्र झाल्यानंतर रेल्वे पोलिसांकडून एक मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळाली. रेल्वे पोलिसांनी स्थानिक पोलिस ठाण्यात माहिती दिली. मृताच्या ओळखीसाठी कुटुंबियांना बोलवण्यात आले. त्यांनी त्यांची मुलगी असल्याची पुष्ठी केली. या घटनेनंतर गुप्तचर आणि तांत्रिक घटकांच्या मदतीने आरोपीचा शोध घेण्यात आला.

आरोपीची कबुली

पोलिसांनी संशयित राम सिंह यांचा मुलगा शौर्यवीर सिग याला अटक केले. अटकेनंतर त्याची चौकशी केली. चौकशीतून आरोपीने खुनाची कबुली दिली. आरोपीने सांगितले की, मुलीने मैत्रीसाठी नकार दिला. त्यामुळे तिला रेल्वे रुळावर बोलावण्यात आले. तीला रेल्वे येताच समोर ढकलून दिले होते. भरधाव रेल्वेच्या धडकेत मुलाचा मृत्यू झाला. त्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement