Sudden Death in Lucknow: शाळेत खेळत असताना अल्पवयीन मुलीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, लखनऊ येथील घटना

उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेत खेळत असताना एका अल्पवयीन मुलीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना मॉन्टफोर्ट इंटर कॉलेजमध्ये घडली आहे.

Death | Image Used For Representative Purpose | (Photo Credits: unsplash.com)

Sudden Death in Lucknow: उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेत खेळत असताना एका अल्पवयीन मुलीचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना मॉन्टफोर्ट इंटर कॉलेजमध्ये घडली आहे. ही घटना शुक्रवारी सकाळच्या वेळीस घडली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (हेही वाचा- क्रिकेट खेळताना हृदय विकाराचा झटका आल्याने तरुणाचा मृत्यू, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद)

मिळालेल्या माहितीनुसार, मॉन्टफोर्ट इंटर कॉलेजमध्ये ही घटना घडली. मानवी सिंग असं मृत झालेल्या मुलीचे नाव आहे. मानवी मैत्रिणींसोबत वर्गाबाहेर खेळत होते. वर्गाबाहेर खेळत असताना अचानक ती जमिनीवर कोसळलील. तिला तात्काळ शिक्षकांनी फातिमा रुग्णालयात दाखल केले. तिथे डॉक्टरांनी तीला मृत घोषित केले. डॉक्टरांनी तिला ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने सांगितले.

मृत मुलीचे कुटुंब लखनऊच्या विकासनगर भागात राहते. तिच्या कुटुंबियांच्या म्हणण्यानुसार, मुलगी अनेक वर्षापासून आजारी होती आणि तिच्यावर उपचार सुरु होते. त्यांनी कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यास नकार दिला. मुलीच्या मृत्यूनंतर शाळेत एकच खळबळ उडाली. मुलीच्या मृत्यूची माहिती मिळताच शुक्रवारी शाळेला सुट्टी जाहीर करण्यात आली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement