Delhi: झाकीर नावाच्या व्यक्तीला दिल्लीतील डीटीसी बसमध्ये (DTC Bus)अश्लील कृत्य करताना पकडण्यात आले आहे. या प्रकरणाशी संबंधित व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका तरुणीने झाकीरवर असभ्य वर्तनाची तक्रार केली. त्यानंतर बसमध्ये तैनात असलेल्या मार्शलने त्याला पकडले आणि त्याचा व्हिडिओ बनवला. व्हिडिओमध्ये मार्शल आरोपीची चौकशी करताना दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी त्या व्यक्तीवर अश्लील कृत्य केल्याचा आरोप करत असल्याचे ऐकू येत आहे. डीटीसी बसमध्ये तिच्यासोबत प्रवास करणाऱ्या व्यक्तीने तिला पाहताच त्याचा प्रायव्हेट पार्ट काढला आणि घाणेरडे कृत्य करण्यास सुरुवात केली, असा आरोप तरुणीने केला आहे. मुलीच्या तक्रारीनंतर बसमध्ये तैनात असलेल्या मार्शलने कारवाई केली. त्यांनी आरोपीला पकडून चौकशी सुरू केली. व्हायरल व्हिडिओमध्ये आरोपी आपले नाव झाकीर सांगत आहे. झाकीरने सांगितले की, तो बिहारचा रहिवासी आहे आणि दिल्लीच्या खजुरी येथे राहतो. (हेही वाचा - Pune Rail Accident: प्रगती एक्सप्रेस मध्ये चढताना महिलेचा तोल गेल्याने गाडी आणि प्लॅटाफॉर्म मध्ये अडकलेल्या महिलेला स्टेशन वरील कर्मचार्याकडून जीवनदान (Watch Video))
व्हिडिओमध्ये लोक त्याला फटकारतानाही ऐकू येत आहेत. यानंतर बसचे मार्शल संदीप सेकारा यांनी आपली ओळख करून दिली आणि घटनेची माहिती दिली. संदीपने सांगितले की, तरुणीच्या तक्रारीवरून आरोपीला पकडण्यात आले असून त्याची माहिती पोलिसांनाही देण्यात आली आहे. आता आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. संपूर्ण व्हिडिओमध्ये आरोपी झाकीर रडताना दिसत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये मार्शल संदीप पीडित मुलीला मदत करता ना दिसले होते. तर दुसरीकडे यापूर्वी आणखी एक घटना समोर आली होती, ज्यामध्ये दिल्ली डीटीसी बस मार्शलवर महिला मार्शलवर बलात्काराचा आरोप करण्यात आला होता. वृत्तानुसार, तौसीफ नावाच्या मार्शलने सहकारी महिला मार्शलला तिच्या वाढदिवसाच्या बहाण्याने आपल्या घरी बोलावले आणि तिला अंमली पदार्थ देऊन बलात्कार केला.