Tamil Nadu Shocker: धक्कादायक ! एका व्यक्तीने कुटूंबातील 5 जणांची हत्या केल्यानंतर घेतला गळफास

पलानीसामी असे या व्यक्तीचे नाव असून, तो जिल्ह्यातील चेंगमजवळील ओरांवडी (Oranwadi) गावातील शेतमजूर होता.

Crime | (File image)

तामिळनाडूमधील (Tamil Nadu) चेंगम (Chengam) तालुक्यात एका व्यक्तीने आपली पत्नी आणि दोन किशोरवयीन मुलींसह चार मुलांची कथितपणे हत्या (Murder) केली. नंतर स्वत: त्यानेही आत्महत्या (Suicide) केली, असे पोलिसांनी मंगळवारी सांगितले. आणखी एक मुलगी, वय सुमारे 9 वर्षे, जखमांसह येथील शासकीय रुग्णालयात दाखल आहे. पलानीसामी असे या व्यक्तीचे नाव असून, तो जिल्ह्यातील चेंगमजवळील ओरांवडी (Oranwadi) गावातील शेतमजूर होता. या घटनेचे नेमके कारण कळू शकले नसले तरी, संशयास्पद वाटणाऱ्या शेजाऱ्यांनी आज त्यांना माहिती दिल्याने ही घटना उघडकीस आल्याचे पोलिसांनी सांगितले. हेही वाचा  Delhi Crime: बनावट फेसबुक अकाउंट व व्हॉट्सअॅप कॉलद्वारे लोकांची लाखोंची फसवणूक; दिल्लीत चार जणांना अटक

पोलिसांना पलानीसामी छताला लटकलेल्या अवस्थेत सापडले तर त्यांची 37 वर्षीय पत्नी, 3 मुली आणि एक मुलगा मृतावस्थेत आढळले. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, आणखी एका मुलीला, ज्याचे वय सुमारे 9 वर्षे आहे, तिला तातडीने जीएचमध्ये नेण्यात आले. गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement