IPL Auction 2025 Live

उद्योगपती अनिल अंबानी यांच्याविरोधात लंडनच्या कोर्टात खटला दाखल

इंडस्ट्रियल एण्ड कमर्शियल बॅंक ऑफ चायना (Industrial and Commercial Bank of China), चायना डेव्हलपमेंट बॅंक (China Development Bank) आणि एक्सपोर्ट- इंपोर्ट बॅंक ऑफ चायना (Exim Bank of China) यांच्याकडून रिलायन्स कम्युनिकेशन म्हणजेच आरकॉमला 2012 साली कर्ज दिले होते.

Anil Ambani| (Photo Credits: PTI/File)

रिलायन्स ग्रुपचे (Reliance) प्रमुख अनिल अंबानी (Anil Ambani) पुन्हा अडचणीत सापडले असून 3 चीनी बॅंकांकडून यांच्याविरोधात लंडनच्या कोर्टात (London Court) खटला दाखल करण्यात आला आहे. इंडस्ट्रियल एण्ड कमर्शियल बॅंक ऑफ चायना (Industrial and Commercial Bank of China), चायना डेव्हलपमेंट बॅंक (China Development Bank) आणि एक्सपोर्ट- इंपोर्ट बॅंक ऑफ चायना (Exim Bank of China) यांच्याकडून रिलायन्स कम्युनिकेशन म्हणजेच आरकॉमला 2012 साली कर्ज दिले होते. रिलायन्स कंपनीकडून अजूनही त्यांचे कर्ज फेडण्यात आलेले नाही. यामुळे वरील तिन्हीही बॅंकांकडून हे पाऊल उचलण्यात आले आहे.

इंडस्ट्रियल एण्ड कमर्शियल बॅंक ऑफ चायना, चायना डेव्हलपमेंट बॅंक आणि एक्सपोर्ट- इंपोर्ट बॅंक ऑफ चायना या तिन्ही बॅंकांनी 48.53 अब्ज रुपयांचा दावा अंबानी यांच्याविरोधात ठोकला आहे. वरील चीनी बॅंकांनी 2012 साली अनिल अंबानी यांना 92.52 कोटी डॉलरचे कर्ज दिले होते. मात्र, अनिल अंबानी यांच्याकडून हे कर्ज फेडण्यात आले नाही, असे संबधित बॅंकांनी याचिकेत नमुद केले आहे. यावर अनिल अंबानी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. हे देखील वाचा- अनिल अंबानी यांच्या रिलायन्स हेल्थ इन्शुरन्स कंपनीला IRDAI चा झटका; यापुढे एकही नवी विमा पॉलिसी विकता येणार नाही

याआधीही रिलायन्स कम्युनिकेशनचे अध्यक्ष अनिल अंबानी यांनी टेलिकॉम उपकरणे कंपनी एरिक्सनकडून कर्ज घेतले होते. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने रिलायन्य अनिल अंबानींना एरिक्सनच्या कर्जाची परतफेड करण्याचे आदेश दिला होता. दरम्यान, अनिल अंबानी यांनी  या कर्जाची जाणीवपूर्वक परतफेड केली नाही, असे सांगत अंबानींना न्यायालयाच्या अवमानप्रकरणी दोषी ठरवले होते.