Chhatishgarh Shocker: अल्पवयीन युगलाची झाडाला लटकून आत्महत्या, छत्तीसगड येथील घटना

दोन अल्पवयीन युगलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना छत्तीसगड येथील बलरामपूर जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. दोघांन्ही आत्महत्या केल्याची माहिती गावात पसरताच, गावात खळबळ उडाली आहे.

Chhatishgarh Shocker: अल्पवयीन युगलाची झाडाला लटकून आत्महत्या, छत्तीसगड येथील घटना
Suicide | (Photo Credits: unsplash.com)

Chhatishgarh Shocker: दोन अल्पवयीन युगलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना छत्तीसगड येथील बलरामपूर जिल्ह्यातील एका गावात घडली आहे. दोघांन्ही आत्महत्या केल्याची माहिती गावात पसरताच, गावात खळबळ उडाली आहे. गावातील एका शेतात दोघांन्ही झाडाला लटकून आत्महत्या केली. पोलिस या घटनेची अधिक तपास करत आहे. कोणतीही सुसाईट नोट सापडली नसल्याने पोलिस संभ्रमात आहे. (हेही वाचा- कांदिवली पूर्व येथे नैराश्याने ग्रस्त वृद्ध जोडप्याची आत्महत्या)

मिळालेल्या माहितीनुसार, बलरामपूर जिल्ह्यातील धांधापूर गावात आत्महत्या केली. आत्महत्या करणारा मुलगा हा 17 वर्षाचा होता तर आत्महत्या करणारी मुलगी 15 वर्षाची होती. गावकऱ्यांनी सांगितले की, दोघे ही एकमेकांच्या प्रेमसंबंधात होते. दोघांन्ही आत्महत्या का केली हे अद्याप समोर आले नाही. एका  मेंढपाळाने सोमवारी सकाळी दोघांना लटकलेल्या अवस्थेत दिसून आले.

या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी दोघांना झाडावरून खाली उतरवले. दोघांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. मुलगा बलरामपूर जिल्ह्यातील बघिमा गावातील रहिवासी होता. तो धांधापूर येथील गावात नातेवाईकांकडे आला होता. परिसरात कोणतीही सुसाईट नोट सापडली नाही. पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहे.

(The above story first appeared on LatestLY on May 20, 2024 12:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).