Car Fire After Collision in Rajasthan: राजस्थानमध्ये ट्रकच्या धडकेत लागली कारला आग; एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू
अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या, मात्र आग आटोक्यात येईपर्यंत कुटुंबीयांचा मृत्यू झाला होता.
Car Fire After Collision in Rajasthan: राजस्थान (Rajasthan) च्या सीकर जिल्ह्यात रविवारी दुपारी ट्रकने धडक दिल्यानंतर कारला आग (Fire) लागली. या घटनेत कारमधील एकाचं कुटुंबातील 7 जणांचा जिवंत जळून मृत्यू झाला. यामध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि दोन लहान मुलांचा समावेश आहे. पोलिस उपअधीक्षक रामप्रताप बिश्नोई यांनी सांगितले की, कारमधील सात जण सालासर बालाजी मंदिराकडून हिसारच्या दिशेने जात असताना फतेहपूर कोतवाली पोलिस स्टेशन कारने ट्रकला मागून धडक दिली, त्यानंतर गाडीने पेट घेतला.
अधिकाऱ्याने सांगितले की, कारमधील लोक उत्तर प्रदेशातील मेरठचे रहिवासी होते. आगीमुळे कारचे दरवाजे उघडू शकले नाहीत आणि कारमधील तीन महिला, दोन मुले आणि दोन पुरुष जळून खाक झाले. प्राप्त माहितीनुसार, धडकेनंतर कारमधील गॅस किटला आग लागली आणि ट्रकमध्ये भरलेल्या कापसामुळे ही आग आणखी भडकली. कारमधील प्रवाशांना बंद दरवाजे उघडता आले नाहीत आणि ते या घटनेत जिवंत जाळले गेले. (हेही वाचा - Delhi School Bus Caught Fire: दिल्लीत शाळेच्या आवारात उभ्या असलेल्या खाजगी बसला भीषण आग, पहा व्हिडिओ)
अपघाताचे साक्षीदार रामनिवास सैनी यांनी सांगितले की, प्रवासी मदतीसाठी ओरडत होते पण आगीमुळे त्यांना मदत करता आली नाही. अग्निशमन दलाच्या गाड्या तैनात करण्यात आल्या, मात्र आग आटोक्यात येईपर्यंत कुटुंबीयांचा मृत्यू झाला होता. (वाचा -Uttarkhand Accident: पूजेसाठी गंगाजल आणण्यासाठी गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला, कार दरीत कोसळल्याने जागीच 4 जणांचा मृत्यू)
नीलम गोयल (55), आशुतोष गोयल (35), मंजू बिंदल (58), हार्दिक बिंदल (37), स्वाती बिंदल (32) अशी मृतांची नावे आहेत. यात दोन अल्पवयीन मुलींचाही समावेश आहे. दरम्यान, ट्रक चालक व मदतनीस घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारचा मालक आशुतोष याने दीड वर्षांपूर्वी कार विकली होती. पोलिसांनी कार विकणाऱ्या एजंटशी संपर्क साधला आणि त्याच्यामार्फत कुटुंबाची ओळख पटवली.