Andhra Pradesh: 2250 रुपयांच्या पेंशनसाठी 92 वर्षीय वृद्धाने केली पत्नीची हत्या
आंध्र प्रदेशातील गुंटूरमध्ये केवळ 2250 रुपयांच्या पेन्शनसाठी 92 वर्षांच्या वृद्धाने आपल्या 90 वर्षीय पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशातील गुंटूरमध्ये केवळ 2250 रुपयांच्या पेन्शनसाठी (Pension) 92 वर्षांच्या वृद्धाने आपल्या 90 वर्षीय पत्नीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दोघांचे 25 वर्षांपूर्वी लग्न झाले होते. हत्येचा आरोप असलेल्या व्यक्तीचे नाव सॅमुअल असे असून खून झालेल्या वृद्ध महिलेचे नाव अप्रायम्मा असे आहे. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार, सरकारच्या पेन्शन योजनेंतर्गत अप्रायम्माला दरमहा पैसे मिळत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पेन्शनच्या पैशांवरुन सॅमुवेल आणि अप्रायम्मा यांच्यात वाद झाला. 2 नोव्हेंबरच्या रात्री पैशांच्या वादानंतर सॅमुवेलने काठीने मारहाण करत पत्नीची हत्या केली. त्यानंतर आरोपींनी पत्नीच्या हत्येची माहिती आपल्या मुलाला आणि नातवंडांना दिली. (हेही वाचा - मध्य प्रदेश: चेटकीण समजून मुलाने केली 65 वर्षीय आईची हत्या; आरोपीला अटक)
अप्रायम्माच्या हत्येसंदर्भात माहिती मिळाल्यानंतर संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली. मत वृद्धेच्या मुलाने दिलेल्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सॅमुवेलला अटक केली असून त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (वाचा - Uttar Pradesh: कोरोना विषाणू संक्रमित महिलेची आत्महत्या; 'करवा चौथ' उपवासास विरोध केल्याच्या रागातून कृत्य)
या प्रकरणी सोंदरू पोलिस निरीक्षक बी रमेश बाबू यांनी सांगितले की, सॅमुवेल गेल्या 10 वर्षांपासून त्याच गावात पत्नीसह राहत होता. या जोडप्याला तीन मुली आणि तीन मुले व नातवंडे आहेत. 3 नोव्हेंबर रोजी पहाटे साडेतीनच्या सुमारास त्याने पत्नीला काठीने मारहाण केली. या घटनेत वृद्ध महिलेचा जाग्यावर मृत्यू झाला.
राज्य सरकार कुटुंबातील केवळ एका व्यक्तीला 2,250 रुपये पेन्शन देते. अप्रायम्मा दरमहा ही रक्कम मिळच असे. ती या पेन्शन रकमेचा काही भाग सॅमुवेलला द्यायची. पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, रविवारी रात्री सॅमुवेल अप्रायम्माकडे गेला आणि त्याने त्याच्या खर्चासाठी 200 रुपये अधिक मागितले. परंतु यास अप्रायम्माने नकार दिला. यामुळे रात्री उशिरापर्यंत दोघांमध्ये भांडण सुरू झाले. सॅमुवेलने सोमवारी पहाटे काठीने आपल्या पत्नीची हत्या केली.