Kisan Andolan 2.0: शेतकरी आंदोलनात सहभागी असलेल्या 65 वर्षीय शेतकऱ्याचा शंभू सीमेवर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
ज्ञान सिंग हे अविवाहित होते. ते आपल्या पुतण्यांकडे राहत होते.
Kisan Andolan 2.0: हरियाणातील (Haryana) अंबाला (Ambala) येथे शंभू सीमेवर (Shambhu Border) किसान आंदोलनात (Kisan Andolan 2.0) सहभागी असलेल्या एका शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने (Heart Attack) मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, आंदोलनात सहभागी असलेल्या एका शेतकऱ्याला गुरुवारी सायंकाळी हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज शेतकऱ्याचे पार्थिव शंभू सीमेवर आणण्यात येणार असून येथे शेतकरी त्यांना श्रद्धांजली वाहणार आहेत.
ज्ञान सिंह असे मृत शेतकऱ्याचे नाव असून ते गुरुदासपूर जिल्ह्यातील रहिवासी होते. त्यांचे वय 65 वर्षे होते. अंबाला येथील शंभू सीमेवर पंजाबच्या शेतकऱ्यांसोबत ते आंदोलनात सहभागी झाले होते. गुरुवारी सायंकाळी उशिरा छातीत तीव्र वेदना होत असल्याची तक्रार केल्यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (हेही वाचा -Rail Roko Andolan for MSP: एमएसपीसाठी किसान मजदूर संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली रेल रोको आंदोलन, रुळांवर ठिय्या (Watch Video))
पटियालाचे उपायुक्त शौकत अहमद परे यांनी सांगितले की, वैद्यकीय नोंदीनुसार शेतकऱ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. ज्ञान सिंह हे किसान मजदूर संघर्ष समिती (KMSC) शी संलग्न होते, जो किसान मजदूर मोर्चाचा (KMM) भाग आहे. ज्ञान सिंग हे अविवाहित होते. ते आपल्या पुतण्यांकडे राहत होते. (हेही वाचा - Farmer Protest: शेतकऱ्यांच्या 'रेल रोको' आंदोलनामुळे हरियाणातील अंबालामध्ये 180 गाड्या रद्द)
दरम्यान, ज्ञान सिंग यांचा पुतण्या जगदीशने इंडियन एक्स्प्रेसला सांगितले की, 13 फेब्रुवारीला जेव्हा गोळीबार सुरू झाला तेव्हा माझे काका त्या ठिकाणाजवळ गेले होते. तेथे अश्रूधुराचे नळकांडे फोडले जात होते. तेव्हापासून त्यांना श्वास घेताना अस्वस्थ वाटत होते. त्यांना यानंतर औषध चालू होते.