Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशमधील शिवपुरीमध्ये खेळताना गळ्यात दोरी अडकल्याने 11 वर्षीय मुलाचा मृत्यू

लटकल्याचे दिसते. हा सर्व प्रकार अपघाताने घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Death Representative Image

Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यात एका 11 वर्षाच्या मुलाचा घरात दोरीशी खेळताना अपघाताने लटकून मृत्यू झाला. यासदंर्भात एका पोलिस अधिकाऱ्याने सोमवारी माहिती दिली. रविवारी तारकेश्वरी कॉलनीतील मुलाच्या घरी ही घटना घडली. या मुलाची आई शेजारच्या घरी आणि वडील त्यांच्या तळमजल्यावरील दुकानात होते, असे शिवपुरी देहाट पोलीस ठाण्याचे प्रभारी विकास यादव यांनी सांगितले.

या मुलाने छताला दोरी लटकवली होती आणि तो नियमितपणे त्याच्याशी खेळत असे. रविवारी त्याचे नातेवाईक घरी पोहोचले तेव्हा त्यांना तो छताला लटकलेला दिसला. जवळच्या रुग्णालयात पोहोचल्यावर त्याला मृत घोषित करण्यात आले. लटकल्याचे दिसते. हा सर्व प्रकार अपघाताने घडला असल्याचे यादव यांनी सांगितले. (हेही वाचा - Bihar Shocker: खासगी कोचिंग शिक्षकाची 5 वर्षीय चिमुरड्याला बेदम मारहाण; बेशुद्ध मुलावर रुग्णालयात उपचार सुरू)

आतापर्यंत खेळताना अपघाताने अनेक चिमुरड्यांना आपला जीव गमवावा लागला आहे. मध्य प्रदेशात घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. याशिवाय मृत बालकाच्या कुटुंबियावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.