काश्मीर खोऱ्यात गेल्या 24 तासांत भारतीय लष्कराकडून 9 दहशतवाद्यांचा खात्मा

दक्षिण काश्मीरमधील बाटपुरा येथे चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं असून केरन सेक्टरमधील नियंत्रण रेषेत इतर 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. केरन सेक्टरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेतून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता.

Representational Image (Photo Credits: IANS)

काश्मीर खोऱ्यात (Kashmir Valley) गेल्या 24 तासांत भारतीय लष्कराने 9 दहशतवाद्यांचा (Terrorists) खात्मा केला आहे. दक्षिण काश्मीरमधील बाटपुरा येथे चार दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं असून केरन सेक्टरमधील नियंत्रण रेषेत इतर 5 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. केरन सेक्टरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांनी नियंत्रण रेषेतून घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता.

दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये झालेल्या चकमकीत 1 जवान शहीद झाला आहे. तर 2 जवानांची प्रकृती गंभीर आहे. यासंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेनं माहिती दिली आहे. देशात कोरोनाने थैमान घातले असताना पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात येत आहे. (हेही वाचा - 5 एप्रिल रोजी दिवे लावण्याच्या आवाहनाचे आठवण करुन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे 'शॉर्ट अँड स्वीट' ट्विट)

दरम्यान, दक्षिण काश्मीरमधील बाटपूरामध्ये शनिावारी 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. तर 5 दहशतवाद्यांना एलओसीजवळ ठार करण्यात आलं आहे. हे दहशतवादी घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत होते. परंतु, भारतीय जवानांनी त्यांचा हा कट उधळून लावला आहे. भारतीय जवानांकडून दहशतवाद्यांना चौख प्रतिउत्तर देण्यात येत आहे. अद्याप दहशतवादी आणि भारतीय लष्करात चकमक सुरू आहे. याबाबत भारतीय लष्करातील सुत्रांनी माहिती दिली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif