Delhi Shocker: लज्जास्पद! दिल्लीतील 85 वर्षीय महिलेवर बलात्कार; नराधमाने ब्लेडने कापले वृद्धेचे ओठ, 28 वर्षीय आरोपीला अटक

रिपोर्टनुसार, घरात झोपलेल्या वृद्ध महिलेवर बलात्कार केल्यानंतर या तरुणाने तिचे ओठ ब्लेडने कापले. सध्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Delhi Shocker: लज्जास्पद! दिल्लीतील 85 वर्षीय महिलेवर बलात्कार; नराधमाने ब्लेडने कापले वृद्धेचे ओठ, 28 वर्षीय आरोपीला अटक
Stop Rape | Representational Image (Photo Credits: File Image)

Delhi Shocker: दिल्लीत बलात्काराची आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 85 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी एका 28 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दिल्लीतील नेताजी सुभाष प्लेसमध्ये घडलेल्या या घटनेनंतर दिल्ली महिला आयोगाच्या (DCW) प्रमुख स्वाती मालीवाल यांनी दिल्ली पोलिसांना नोटीस बजावली आहे. रिपोर्टनुसार, घरात झोपलेल्या वृद्ध महिलेवर बलात्कार केल्यानंतर या तरुणाने तिचे ओठ ब्लेडने कापले. सध्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ही घटना उघडकीस आल्यानंतर दिल्ली पोलिसांनी 28 वर्षीय आरोपी आकाशला अटक केली आहे. शुक्रवारी पहाटे 4 वाजता ही महिला घरात झोपली होती. आरोपी आकाशने महिलेच्या घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला आणि तिला मारहाण केली. तसेच ब्लेडने तिचे ओठ कापले. महिलेच्या चेहऱ्यावर आणि प्रायव्हेट पार्टवर अनेक जखमा झाल्या आहेत. (हेही वाचा - Rajasthan Shocker: राजस्थानमध्ये मणिपूर सारखे कृत्य! महिलेला कॅमेऱ्यासमोर विवस्त्र करून मारहाण; पतिसह तिघांना अटक, Watch Video)

डीसीडब्ल्यूच्या प्रमुख स्वाती मालीवाल यांनी एका ट्विटमध्ये दिल्ली पोलिसांकडून एफआयआरची प्रत मागितली आहे. याशिवाय त्यांनी दिल्ली पोलिसांना या प्रकरणाची इतर माहिती महिला आयोगासोबत शेअर करण्यास सांगितले आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 02, 2023 11:27 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).