Rajasthan Shocker: राजस्थानमध्ये मानवतेची पायमल्ली; महिलेला विवस्त्र करुन मारहाण, व्हिडिओही बनवला; पतीसह तिघांना अटक, Watch Video

राजस्थानमधील प्रतापगड जिल्ह्यात ही घटना घडली. येथील धारियावाडमध्ये महिलेला सासरच्यांनी तिला विवस्त्र केले. तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Rajasthan Shocker: राजस्थानमध्ये मानवतेची पायमल्ली; महिलेला विवस्त्र करुन मारहाण, व्हिडिओही बनवला; पतीसह तिघांना अटक, Watch Video
Rajasthan Woman beaten on camera (PC - Twitter/@iamharunkhan)

Rajasthan Shocker: मणिपूरप्रमाणेच राजस्थानमध्येदेखील माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. येथे पती आणि त्याच्या कुटुंबीयांनी महिलेला नग्नावस्थेत पीडितेची गावात ढिंड काढली. पीडित महिला तिच्या पतीला सोडून दुसऱ्या कोणाकडे तरी पळून गेली होती. या घटनेमुळे पतीला राग अनावर झाला आणि त्याने आपल्या पत्नीला नग्न करून मारहाण केली. महिलेचा ठावठिकाणा पतीला कळताच त्याने कुटुंबीयांसह जाऊन तिचे अपहरण केले. यानंतर महिलेची विवस्त्र परेड करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी महिलेच्या पतीसह तीन आरोपींना अटक केली आहे.

राजस्थानमधील प्रतापगड जिल्ह्यात ही घटना घडली. येथील धारियावाडमध्ये महिलेला सासरच्यांनी तिला विवस्त्र केले. तिच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. डीजीपी उमेश मिश्रा यांनी सांगितले की, पीडित आणि आरोपी दोघेही आदिवासी समाजाचे आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी गेले. याप्रकरणी आठ जणांची ओळख पटली आहे. तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. इतरांचा शोध सुरू आहे. (हेही वाचा - Manipur Violence: मणिपूर मधील महिलांवरून क्रुर अत्याचारांच्या वायरल व्हिडीओ ची SC कडूनही दखल; सरकारला तातडीने कारवाईचे निर्देश)

मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विट करत पोलीस याप्रकरणी कडक कारवाई करत असल्याचं म्हटलं आहे. सुसंस्कृत समाजात अशा लोकांना स्थान नाही. अशा गुन्हेगारांना अटक केली जाईल. हे प्रकरण जलदगती न्यायालयात पाठवून शिक्षा होईल.

त्याचवेळी भाजपच्या नेत्या आणि माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी ट्विट करून म्हटले आहे की, मुख्यमंत्री महोदय, अशी कोणती मजबुरी आहे की तुमच्या काँग्रेसला राजस्थानातील इज्जत लुटणे आणि मुलींच्या किंकाळ्या ऐकू येत नाहीत.

दलितांवरील वाढत्या अत्याचाराच्या मुद्द्यावरून भारतीय जनता पक्ष काँग्रेस सरकारला सातत्याने घेराव घालत आहे. अशा स्थितीत निवडणुकीपूर्वी भाजपला मोठा मुद्दा मिळाला आहे.

(The above story first appeared on LatestLY on Sep 02, 2023 08:45 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).