Farmers Protest Tractor Rally: शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमधील हिंसाचारात 86 पोलीस जखमी; 4 जणांवर गुन्हा दाखल

दिल्लीच्या वेगवेगळया भागात पोलीस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये हिंसक चकमक झाली.

Tractor Parade | (Photo Credit: ANI)

कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत (Delhi) मागच्या दोन महिन्यांपासून शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाला (Farmers Protest) आज (26 जानेवारी) हिंसक वळण लागले. दिल्लीच्या वेगवेगळया भागात पोलीस आणि आंदोलक शेतकऱ्यांमध्ये हिंसक चकमक झाली. या हिंसाचारात 8 बस आणि 17 खासगी वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. तर, 83 पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी 4 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तसेच या हिचाचाराप्रकरणी आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे.

केंद्राच्या नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकर्‍यांनी आज प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने ट्रॅक्टर परेड काढली. पण या ट्रॅक्टर परेडमध्ये अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी नियोजित मार्ग सोडून दुसऱ्याच रस्त्यांवरून ट्रॅक्टर घुसवण्यात आले. तसंच अनेक ठिकाणी तोडफोड केल्याचेही वृत्त आहे. तसेच शेतकऱ्यांनी अत्यंत हिंसक मार्गाने ही ट्रॅक्टर परेड काढली, असा आरोप दिल्ली पोलिसांचे सहआयुक्त (पूर्व रेंज) आलोक कुमार यांनी केला आहे. हे देखील वाचा- Internet Services Snapped in Delhi-NCR: राजधानी दिल्ली-एनसीआर परिसरात काही भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद

एएनआयचे ट्वीट-

दिल्लीत आंदोलक शेतकरी आणि पोलिसांमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. तसेच या हिंसाचाराला केंद्र सरकारच जबाबदार आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.