Payments Scam In UCO Bank: युको बँकेत 820 कोटी रुपयांचा पेमेंट घोटाळा; CBI चे 7 शहरांमध्ये छापे

गेल्या वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती.

UCO Bank (PC - Wikimedia Commons)

Payments Scam In UCO Bank: सार्वजनिक क्षेत्रातील UCO बँकेसंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. संशयास्पद IMPS व्यवहार प्रकरणी केंद्रीय तपास संस्थेने (CBI) दोन राज्यांतील 67 ठिकाणी छापे टाकले आहेत. हे व्यवहार 800 कोटी रुपयांहून अधिक किमतीचे आहेत. छाप्यादरम्यान सीबीआयने या ठिकाणांहून अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि डिजिटल उपकरणे जप्त केली आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर 2023 मध्ये या संदर्भात तक्रार दाखल करण्यात आली होती.

CBI चे राजस्थान आणि महाराष्ट्रात छापे -

सीबीआयने बुधवारी राजस्थान आणि महाराष्ट्रात छापे टाकले. 820 कोटी रुपयांच्या संशयास्पद IMPS व्यवहारांबाबत छाप्यादरम्यान UCO बँक आणि IDFC शी संबंधित सुमारे 130 कागदपत्रांसह 43 डिजिटल उपकरणेही जप्त केली आहेत. यामध्ये 40 मोबाईल फोन, 2 हार्ड डिस्क आणि 1 इंटरनेट डोंगल आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. युको बँकेच्या वेगवेगळ्या खात्यांमधून हे व्यवहार करण्यात आले. (हेही वाचा - RBI's Major Material Supervisory Concerns: पेटीएम ते बॅंक ऑफ बडोदा मध्ये आरबीआय कडून नुकतेच घालण्यात आलेले महत्त्वाचे निर्बंध पहा!)

बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, हे प्रकरण 8,53,049 हून अधिक IMPS व्यवहारांशी संबंधित आहे. ज्याद्वारे हे पैसे हस्तांतरित केले गेले. हे सर्व व्यवहार गेल्या वर्षी 10 नोव्हेंबर ते 13 नोव्हेंबर 2023 दरम्यान झाले होते. सात खाजगी बँकांच्या 14,600 खात्यांमधून UCO बँकेच्या 41,000 खातेदारांच्या खात्यांमध्ये IMPS व्यवहार चुकीच्या पद्धतीने झाल्याचे सांगण्यात आले. (हेही वाचा - RBI MPC: बँक ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! आता बँकांना मनमानी शुल्क आकारता येणार नाहीत; RBI ने घेतला 'हा' मोठा निर्णय)

IMPS व्यवहार म्हणजे?

तात्काळ पेमेंट सेवा म्हणजेच IMPS ही प्रत्यक्षात बँकेद्वारे प्रदान केलेली सेवा आहे. ज्याद्वारे लोकांना इंटरनेट आणि फोन बँकिंगद्वारे त्वरित पैसे हस्तांतरित करण्याची सुविधा मिळते. रिअल टाइम व्यवहारांमुळे, बहुतेक लोक ही पेमेंट सेवा वापरतात. तथापि, या सेवेद्वारे पैसे हस्तांतरित करण्यासाठी, बँकेद्वारे एक मर्यादा देखील निश्चित केली जाते, ज्यामुळे जास्त रकमेचे व्यवहार होत नाहीत.

युको बँकेच्या शेअर्सवर परिणाम -

सीबीआयच्या छाप्याचा सरकारी बँकांच्या शेअर्सवर परिणाम झाला आहे. गुरुवारी, युको बँकेचे समभाग शेअर बाजारातील व्यवहाराच्या प्रारंभी 58.90 रुपयांवर उघडले आणि बाजार बंद असताना 2.48 टक्क्यांच्या घसरणीसह 57.10 रुपयांवर बंद झाले. या बँकिंग शेअरची सर्वकालीन उच्च पातळी 70.65 रुपये आहे आणि निम्न पातळी 22.25 रुपये आहे.