Odisha: ओडिशा पोलिसांची मोठी कारवाई! जुगार खेळण्याच्या आरोपाखाली 80 जणांना अटक; ओडिशातील नुआपाडा जिल्ह्यातील घटना

ओडिशा पोलिसांनी नुआपाडा जिल्ह्यातील जानका परिसरातून जुगार खेळल्याप्रकरणी 80 जणांना अटक केली आहे. याबाबतची माहिती ओडिशा पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. पीटीआयने तसे वृत्त दिले आहे.

Photo Credit- Pixabay

Odisha: ओडिशा पोलिसांनी नुआपाडा जिल्ह्यातील जानका भागात मोठी कारवाई केली. जुगार (Gambling) खेळल्याप्रकरणी 80 जणांना अटक केलीस आहे. रविवारी ही घटना समोर आली. शनिवारी उशिरा एका निर्जन इमारतीवर टाकलेल्या छाप्यांमध्ये त्यांच्याकडून सुमारे 29 लाख रुपयांची रोकडही जप्त करण्यात आली. एवढ्या मोठ्या संख्येने आरोपींना अटक केल्याने पोलिसांच्या या कारवाईने अनेकांना आर्श्चयाचा धक्का बसला आहे. (हेही वाचा: Andhra Pradesh Accident: दुर्दैवी! आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात बस आणि ऑटोची धडक; 7 जणांचा मृत्यू)

"जुगाराचा अड्डा या भागात बराच काळ सुरू होता आणि स्थानिक नागरिकांसह मोठ्या संख्येने लोक जुगार खेळत होते," असे पोलिसांच्या निवेदनात म्हटले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून जुगाराचे साहित्यही जप्त केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement