Haryana Accident: हरियाणा रोडवेज आणि क्रूझरचा भीषण अपघात! 8 जणांचा मृत्यू

बिबीपूर गावाजवळ भिवानी डेपो रोडवेजची बस आणि वाहन यांच्यात समोरासमोर धडक झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Accident (PC - File Photo)

हरियाणातील जिंदमधील भिवानी रोडवर शनिवारी सकाळी रोडवेज बस आणि क्रूझर यांच्यात समोरासमोर धडक झाली. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी सहा रुग्णवाहिका पाठवण्यात आल्या असून, जखमींना क्रूझरमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. टक्कर इतकी जोरदार होती की मृतांचे मृतदेह क्रूझरच्या आत अडकले. आजूबाजूच्या लोकांकडून मृतदेह क्रूझरमधून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ज्या बसला क्रुझरची धडक बसली ती भिवानी रोडवेज डेपोची बस असून चालकालाही गंभीर दुखापत झाली आहे. (हेही वाचा - MSRTC Bus Accident: साताऱ्याला जाणाऱ्या एमएसआरटीसी बसचा ठाण्यातील विवियाना मॉलजवळ अपघात, चालक आणि कंडक्टर गंभीर जखमी)

जिंदमधील भिवानी रोडवर बस आणि क्रुझर यांच्यात धडकल्याने मोठा अपघात झाला. बिबीपूर गावाजवळ भिवानी डेपो रोडवेजची बस आणि वाहन यांच्यात समोरासमोर धडक झाल्याचे सांगण्यात येत आहे. ज्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, क्रूझरमधील दोन जणांचे मृतदेह सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले आहेत. या अपघातात 8 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

बस आणि क्रूझरची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. जखमींना तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी जिंद सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif