7th Pay Commission: नववर्षात निवृत्त शिक्षकांना मिळणार खूषखबर; पेंशन आणि ग्रॅज्युटी मध्ये होणार वाढ!
सध्या हा फायदा या शिक्षकांना मिळत नाही.
भोपाळ केंद्रीय विद्यालयाच्या (Bhopal Kendriya Vidyalaya) शिक्षकांना आता केंद्र सरकारने निवृत्तीनंतर ग्रॅज्युटी (Grant Gratuity)आणि पेन्शन (Pension) देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. HRD मंत्रालयाचे रमेश पोखरियाल यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये याबद्दलची घोषणा करण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर भोपाळ केंद्रीय विद्यालयाचे शिक्षक मार्च 2019 नंतर निवृत्त झाले आहेत त्यांना ग्रॅज्युटी आणि कम्युटेट पेंशनचा फायदा मिळणार आहे. सध्या हा फायदा या शिक्षकांना मिळत नाही. दरम्यान यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये याबद्दल तरतूद करण्याची देखील सोय करण्यात आली आहे. 7th Pay Commission: Death Gratuity आणि Pension यामध्ये गल्लत नको; सातव्या वेतन आयोगानुसार सरकारने स्वीकरले आहेत 'ग्रॅज्युटी'च्या रक्कमेत महत्त्वाचे बदल!
7 वे वेतन आयोग अंतर्गत सरकार केंद्रीय विद्यालयाच्या कर्मचार्यांच्या सॅलरीमध्ये वाढ करण्याच्या विचारात आहेत. केवीएसच्या पर्सनल विभागाच्या मागणी नुसार, 4200 ग्रेड पे असणार्या कर्मचार्यांची सॅलरी वाढवून 4600 ग्रेड पे करण्यात आला. यामुळे हजारो कर्मचार्यांच्या पगारामध्ये 5000 रूपयांची वाढ झाली. यासोबतच प्रमोशन लेव्हल देखील 6-7 करण्यात आली आहे.
दरम्यान ऑगस्ट महिन्यात केंद्र सरकारने केंद्रीय विद्यालयाच्या शिक्षकांच्या वेतनामध्ये सातव्या वेतन आयोगानुसार वाढ करण्याचा निर्णय करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांच्या ग्रेड पे मध्ये 4200 वरून 4600 रूपये झाला आहे. त्याच्या लेव्हलमध्ये 6-7 करण्यात आला. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, केंद्रीय विद्यालयाच्या शिक्षकांच्या पगारात 5 हजार रूपायांची वाढ करण्यात आली आहे.