Tripura Shocker! 64 वर्षीय नराधमाने 2 वर्षीय चिमुरडीवर केला बलात्कार; आरोपीला अटक

सहाय्यक महानिरीक्षक ज्योतिषमान दास चौधरी यांनी सांगितले की, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. तेथून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.

Tripura Shocker! 64 वर्षीय नराधमाने 2 वर्षीय चिमुरडीवर केला बलात्कार; आरोपीला अटक
Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: IANS)

Tripura Shocker: त्रिपुरा (Tripura) मध्ये एका 2 वर्षीय मुलीवर बलात्कार (Rape) झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी 64 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली असून तो पीडितेचा शेजारी आहे. पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, धलाई जिल्ह्यातील कमालपूर भागात ही घटना घडली. जमशेद अली असे आरोपीचे नाव असून त्याने 11 नोव्हेंबर रोजी आपल्या घरी पीडीतेवर बलात्कार केला.

सहाय्यक महानिरीक्षक ज्योतिषमान दास चौधरी यांनी सांगितले की, आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले. तेथून त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्रिपुरामध्ये गेल्या अडीच वर्षात महिलांविरुद्धच्या एकूण 2,164 गुन्ह्यांची नोंद झाली असून त्यापैकी 407 बलात्काराच्या घटना आहेत. या 407 घटनांपैकी 381 बलात्काराच्या आणि इतर 26 सामूहिक बलात्काराचे आहेत. (हेही वाचा - Aftab Killed Shraddha: आफताबने केली गर्लफ्रेंड श्रद्धाची हत्या; मृतदेहाचे 35 तुकडे करून दिल्लीत वेगवेगळ्या ठिकाणी फेकले, 6 महिन्यांनंतर झाला खुलासा)

काही दिवसांपूर्वी राज्यात दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. 19 ऑक्टोबर रोजी उनाकोटी जिल्ह्यातील कुमारघाट येथे 16 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. दुसरीकडे, 26 ऑक्टोबर रोजी खोवई जिल्ह्यातील कल्याणपूरमध्ये एका 13 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याशिवाय, उत्तराखंडच्या बागेश्वर पोलिसांनी 16 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेल्या बलात्कारी पित्याला बऱ्याच प्रयत्नांनंतर अटक केली. आरोपी बलात्कारानंतर फरार झाला होता. आरोपीने आपल्या अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्यानंतर तिला एका खोलीत बंद केले होते. पोलिसांनी घटनास्थळी तपास केला असता तपासात तथ्य आढळून आले. कलम 376, 342, 363 आणि लैंगिक शोषण संरक्षण कायद्याच्या कलम 3/4 अंतर्गत आरोप नोंदवून आरोपीला अटक करण्यात आली.

(The above story first appeared on LatestLY on Nov 14, 2022 04:51 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).