Madhya Pradesh Shocker: सरकारी शाळेत जेवल्यानंतर 58 विद्यार्थी आजारी, मध्यप्रदेशातील रिवा येथील घटना
मध्य प्रदेशातील रिवा जिल्ह्यात एका सरकारी शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात जेवल्यानंतर 58 विद्यार्थी आजारी पडले आहे अशी माहिती शुक्रवारी एका अधिकाऱ्याने माध्यमांना दिली आहे.
Madhya Pradesh Shocker: मध्य प्रदेशातील रिवा जिल्ह्यात एका सरकारी शाळेत प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात जेवल्यानंतर 58 विद्यार्थी आजारी पडले आहे अशी माहिती शुक्रवारी एका अधिकाऱ्याने माध्यमांना दिली आहे. 58 विद्यार्थ्यांपैकी बहुतेकांची प्रकृती स्थिर आहे तर एका मुलीला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर परिसरात घबराट निर्माण झाली आहे.( हेही वाचा- पश्चिम बंगालमध्ये इफ्तारनंतर 100 हून अधिकजण पडले आजारी, अनेकजण गंभीर)
मिळालेल्या माहितीनुसार, सिरमौर भागातील पेद्री येथील शाळेत ध्वजारोहण समारंभानंतर मुलांना जेवण पुरु-भाजी आणि लाडू देण्यात आले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली. विद्यार्थ्यांना उलट्या आणि जुलाबाचा त्रास होत होता. मुलांचा तक्रारीनुसार विद्यार्थ्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केले. जिल्हा मुख्य वैद्यकीय आणि आरोग्य अधिकारी (CMHO) डॉ केएल नामदेव यांनी विद्यार्थ्यांना तपासले.
विद्यार्थ्यांना स्थानिक आरोग्य केद्रांत दाखल करण्यात आले. या पैकी एका मुलीची प्रकृती गंभीर असल्याचे समोर येत आहे. गंभीर असलेल्या मुलीला रिवा येथील शासकीय संजय गांधी मेमोरियल हॉस्प्टिटलमध्ये नेण्यात आले आणि तेथे तिच्यावर उपचार सुरु असल्याचे डॉक्टर नामदेव यांनी सांगितले. उर्वरित मुलांची प्रकृती स्थिर असून कुशाभाऊ ठाकरे जिल्हा रुग्णालय आणि शासकीय श्याम शहा वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांच्या पथकाला उपचार देण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.