Coronavirus: दिल्लीत गेल्या 24 तासांत 56 ITBP जवानांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
आतापर्यंत 156 जवानांना कोरोना लागण झाली आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातचं देशातील अनेक पोलिस कर्मचारी, जवान, डॉक्टर्स, नर्संना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
Coronavirus: दिल्लीत (Delhi) गेल्या 24 तासांत 56 ITBP (Indo-Tibetan Border Police) जवानांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. आतापर्यंत 156 जवानांना कोरोना लागण झाली आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशातचं देशातील अनेक पोलिस कर्मचारी, जवान, डॉक्टर्स, नर्संना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
कोरोना विषाणूच्या वेगाने होत असलेल्या फैलावामुळे देशातील परिस्थिती चिंताजनक होत चालली आहे. लॉकडाऊनमुळे देशात कोरोनाचा सार्वत्रिक फैलाव झाला नाही. परंतु, काही ठिकाणी कोरोना रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. आतापर्यंत अनेक बीएसफ जवान कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. (हेही वाचा - केंद्र सरकारडून राज्यांना आतापर्यंत 72 लाख N95 फेस मास्क आणि 36 लाख पीपीई किट्सचा पुरवठा- केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन)
दरम्यान, देशात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असून मागील 24 तासांत देशात 3277 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले आहेत. तर 127 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या भारतात कोरोना बाधितांची एकूण संख्या 62,939 वर पोहोचली आहे. यात 41,472 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.