Rajasthan Shocker: जोधपूरमध्ये 50 वर्षीय महिलेची हत्या; मृतदेहाचे 6 तुकडे करून प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून पुरले

या घटनेमागे गुल मोहम्मद नावाच्या व्यक्तीचा हात असावा, असा संशय पोलिसांना असून त्याचा शोध सुरू आहे.

Murder (Photo Credit - pixabay.com)

Rajasthan Shocker: राजस्थान (Rajasthan) मधील जोधपूर (Jodhpur) मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनिता चौधरी ही 50 वर्षीय महिला दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. पोलिसांना तिचा मृतदेह सहा तुकड्यांमध्ये सापडला. आरोपीच्या घराजवळील खोल खड्ड्यात मृतदेहाचे अवयव प्लास्टिकच्या पिशवीत पुरलेले आढळून आले. या घटनेमागे गुल मोहम्मद नावाच्या व्यक्तीचा हात असावा, असा संशय पोलिसांना असून त्याचा शोध सुरू आहे.

प्राप्त माहितीनुसार, 27 ऑक्टोबरला अनिता चौधरी बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांचे पती मनमोहन चौधरी यांनी सरदारपुरा पोलिस ठाण्यात दाखल केली होती. तपासादरम्यान पोलिसांना अनिताच्या फोनवरून गुल मोहम्मद नावाच्या व्यक्तीच्या संपर्काची माहिती मिळाली, त्यानंतर पोलिसांनी गंगाना गावात आरोपीच्या घरी चौकशी केली. चौकशीदरम्यान, गुल मोहम्मदच्या पत्नीने सुरुवातीला कोणतीही माहिती देण्यास नकार दिला. परंतु कठोर चौकशी केली असता तिने सांगितले की, तिच्या पतीनेच अनिताची हत्या करून मृतदेह घराच्या मागे पुरला. (हेही वाचा - Baba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामध्ये 11वा आरोपी अटकेत; 29 वर्षीय Amit Hisamsing Kumar ला अटक)

12 फूट खड्ड्यात सापडला मृतदेह -

एडीसीपी निशांत भारद्वाज यांच्या नेतृत्वाखालील पोलिस पथकाने जेसीबीच्या साहाय्याने 12 फूट खोल खड्डा खोदला, ज्यामध्ये शरीराचे अवयव प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये सापडले. तपासात मृतदेहाचे सहा तुकडे झाल्याचे निष्पन्न झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी एम्सच्या शवागारात पाठवण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सरदारपुरा बी रोडवरील अग्रवाल टॉवरमध्ये अनिता चौधरी तिचे ब्युटी पार्लर चालवत असे, तर आरोपी गुल मोहम्मदचे दुकानही याच टॉवरमध्ये होते. त्यामुळे दोघांची ओळख झाली. 28 ऑक्टोबर रोजी अनिता शेवटच्या वेळी तिच्या ब्युटी पार्लरमधून निघून गेली होती. त्यानंतर ती घरी परतली नाही. यानंतर पती मनमोहन यांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये अनिता एका ऑटोतून जाताना दिसली. ऑटोचालकाने पोलिसांना गंगाना गावात पोहोचल्याची माहिती दिली. (Baba Siddiqui Murder Case: बाबा सिद्दीकींच्या हत्येमध्ये सहभागी आरोपींचा Lawrence Bishnoiचा भाऊ Anmol Bishnoi सोबत Snapchat वर संभाषण; Mumbai Crime Branch ची माहिती .)

आरोपींचा शोध सुरू -

पोलिसांनी आरोपीच्या पत्नीला ताब्यात घेतले असून शहरातील अनेक भागात गुल मोहम्मदचा शोध सुरू आहे. आरोपीने त्याच्या घराजवळ आधीच खड्डा खोदून ठेवल्याने हत्येची अगोदरच योजना आखण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. अनिताच्या मुलाचा आरोप आहे की, गुल मोहम्मदने आपल्या आईला फसवून मारले. पोलिस आता आरोपींच्या शोधात जोधपूरच्या विविध भागात छापे टाकत आहेत.