Kerala Shocker: कोचीमध्ये 5 वर्षीय मुलीवर बलात्कार, नंतर गळा चिरून हत्या; गोणीत सापडला मृतदेह, आरोपीला अटक
पोलीस तपासात ही मुलगी बिहारमधील स्थलांतरित कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे. ती शुक्रवारी गॅरेज जंक्शन येथील घरातून बेपत्ता झाली होती. स्थानिक बाजारपेठेमागील दलदलीच्या परिसरात गोणीत या मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी सांगितले की, तिच्यावर क्रूरपणे अत्याचार केले गेले.
Kerala Shocker: केरळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने आधी पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार (Rape) केला आणि नंतर तिचा गळा दाबून खून (Murder) केला. मुलीची हत्या केल्यानंतर आरोपींनी तिचा मृतदेह गोणीत टाकून जवळच्या बाजारपेठेत फेकून दिला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्यावर आधी बलात्कार आणि नंतर गळा आवळून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. पोलीस तपासात ही मुलगी शुक्रवारपासून बेपत्ता असल्याचे समोर आलं आहे. मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली.
एराकुलम ग्रामीणचे एसपी विवेक कुमार यांनी सांगितले की, आम्हाला शुक्रवारी संध्याकाळी 7.10 वाजता मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार मिळाली होती. उशीर न करता, आम्ही रात्री 8 वाजण्यापूर्वी या घटनेबाबत एफआयआर नोंदवला आणि तपास सुरू केला. पोलिस पथकाने सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली, त्यादरम्यान आरोपी मुलीला घेऊन जाताना दिसला. यानंतर आम्ही आरोपींना ताब्यात घेतले. (हेही वाचा - UP shocker: कौटुंबिक वादातून चिडून महिला आणि 2 मुलींची आत्महत्या, एटाह परिसरात खळबळ)
पोलीस तपासात ही मुलगी बिहारमधील स्थलांतरित कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे. ती शुक्रवारी गॅरेज जंक्शन येथील घरातून बेपत्ता झाली होती. स्थानिक बाजारपेठेमागील दलदलीच्या परिसरात गोणीत या मुलीचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी सांगितले की, तिच्यावर क्रूरपणे अत्याचार केले गेले.
सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी नराधन आरोपीला बिहारमधून अटक केली आहे. आरोपी पीडित कुटुंबाच्या घराजवळ राहत होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने आधी या घटनेमागे आपला हात नसल्याचं म्हटलं होतं. मात्र, पोलिसांनी त्याची कडक चौकशी केली असता त्याने आपला गुन्हा मान्य केला.
तथापी, आज सकाळी आरोपीने त्याच्या गुन्ह्याची कबुली दिली. यासंदर्भात कोची रेंजचे डीआयजी श्रीनिवास ए यांनी पत्रकारांना माहिती दिली. मात्र, आधी तपास पथकाची दिशाभूल करण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
(The above story first appeared on LatestLY on Jul 30, 2023 02:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

