UP shocker: कौटुंबिक वादातून चिडून महिला आणि 2 मुलींची आत्महत्या, एटाह परिसरात खळबळ
कौटुंबिक वादातून 35 वर्षीय महिला आणि तिच्या दोन मुलींनी आपल्या घरात गळफास लावून घेतला.
UP shocker: यूपी मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे . युपीतील एटाह परिसरामध्ये कौटुंबिक वादातून चिडून महिला आणि 2 मुलींनी आत्महत्या केली. कौटुंबिक वादातून 35 वर्षीय महिला आणि तिच्या दोन मुलींनी आपल्या घरात गळफास लावून घेतला. इटाहचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक राजेश कुमार सिंह यांनी सांगितले की, हा वाद घरातील सर्वात लहान मुलीच्या एका पुरुषासोबतच्या प्रेमप्रकरणावरून होता. ही घटना शनिवारी येथील निधौली कलान भागातील एका गावात घडली, असे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. प्राथमिक तपासानुसार, महिलेची धाकटी मुलगी त्याच गावातील एका व्यक्तीसोबत रिलेशनशिपमध्ये होती.
काही वर्षांपासून या दोघांचे रिलेशन चालू होते .24 जुलै रोजी त्या व्यक्तीने गावात आत्महत्या केली. तिच्या प्रियकराच्या मृत्यूनंतर, मुलीने कथितपणे तिचे जीवन संपवण्याचा प्रयत्न केला परंतु तिची आई आणि बहिणींनी तीला रोखण्याचा प्रयत्न केला, असे अधिकारांने सांगितले. गाझियाबादमध्ये काम करणाऱ्या मुलीच्या वडिलांना या घटनेची माहिती मिळाल्यावर त्यांनी फोनवरून पत्नी आणि दोन मुलींना चांगलेच सुनावले. त्यामुळे महिलेसोबत कौटुंबिक वाद विवाद होवू लागला. सतत कुटूंबात या प्रकरणांहून घरात भाडंण होवू लागले.
संपूर्ण प्रकरणामुळे महिलेने कौटुंबिक वादविवादाला कंटाळून स्वत: ला गळफास लावला, हे पाहून तिच्या मुलींनीही आत्महत्या केली, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. स्थानिकांनी या घटनेची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यात दिली. पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतला. शेजारांच्याशी विचारपुस केल्यानंतर कुटूंबाच्या वाद विवादाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले. पोलीस या संदर्भात आणखी तपास करत आहे. कुटूंबातील तीन सदस्यांनी आत्महत्या केल्यामुळे परिसर हादरले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 30, 2023 11:51 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

