Heatstroke Cases in India: यंदाच्या उन्हाळ्यात उष्माघाताला सामेरे गेलेल्या नागरिकांचा आकडा 40 हजारांच्यावर - रिपोर्ट

तेथे तापमान जवळपास ५० अंश सेल्सिअसपर्यंत गेले होते. उष्माघाताला सामेरे गेलेल्या नागरिकांचा समावेश ही तेथेच आहे.

Photo Credit -X

Heatstroke Cases in India: भारतात या उन्हाळ्यात 40,000 हून अधिक उष्माघाताची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. उष्णतेच्या लाटेने(Heatwave) देशभरात 100 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्याशिवाय भारताच्या ईशान्येकडील भागात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराने अनेकांचा मृत्यू झाला, असे आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

संपूर्ण आशियातील अब्जावधी लोक उष्णतेच्या लाटेंशी झुंजत आहेत, शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार हवामान बदलामुळे परिस्थिती आणखी बिघडली आहे. उत्तर भारतातील तापमान जवळजवळ 50 अंश सेल्सिअसपर्यंत वाढले आहे. अत्याधिक उष्णतेमुळे पक्षी आकाशातून कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मार्च महिन्यात उन्हाळा सुरू झाल्यापासून अलिकडच्या आठवड्यात दिवसा आणि रात्रीच्या दोन्ही वेळेत तापमानाने उच्चांक गाठला आहे. रुग्णालयांनी उष्णतेने प्रभावित रुग्णांची मोठी संख्या नोंदवली.

आरोग्य मंत्रालयाने फेडरल आणि राज्य संस्थांना रूग्णांकडे "तत्काळ लक्ष" देण्याचे आदेश दिले, राजधानी दिल्लीतील रुग्णालयांनी अधिक बेड उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले. आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, 1 मार्च ते 18 जून दरम्यान किमान 110 मृत्यूंची नोंद झाली आहे.

हवामान कार्यालयाने या महिन्यातही सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमानाचा अंदाज वर्तवला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणणयानुसार, असंतुलित क्रियाकलपांमुळे भारतीय शहरे "उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहेत.