40 Students Injured in Bee Attack : मधमाश्यांच्या हल्ल्यात ४० विद्यार्थी जखमी; उत्तर प्रदेशमधील आग्रा येथील घटना
मधमाशाचे पोळे मुले खेळत असलेल्या ठिकाणी कोसळल्याने मधमाशांनी विद्यार्थ्यांचा चावा घेतला.
40 Students Injured in Bee Attack : उत्तर प्रदेश(Uttar Pradesh)मधील आग्रा (Agra) जिल्ह्यातील बह भागात मंगळवारी मधमाशांच्या हल्ल्यात तब्बल 40 शाळकरी मुले जखमी (40 Students Injured in Bee Attack :) झाल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सहा मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुले खेळत असलेल्या ठिकाणी एक मधमाशांचे पोळे(Honeycomb) होते. अचानक ते मधमाशाचे पोळे मुले खेळत असलेल्या ठिकाणी कोसळले. मुलांना काही समजण्याआधीच मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला.यात 40 शाळकरी मुले जखमी झाले. (हेही वाचा : Bees Attack at Wedding Ceremony: लग्नमंडपात मधमाशांचा हल्ला, 12 जण गंभीर जखमी; मध्य प्रदेशातील घटना)
शाळेतील कर्मचाऱ्यांच्या ही गोष्ट लक्षात येताच त्यांनी शाळेचा परिसर रिकामा केला. मात्र, तेवढ्या काळात मधमाशांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचाही चावा घेतला. त्यानंतर काही वेळात ही माहिती वाऱ्यासारखी संपूर्ण गावात पसरली. परिणामी या घटनेनंतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळेबाहेर गर्दी केली होती. मुले जखमी झालयाबद्दल त्यांनी शाळा प्रशासनाला जबाबदार धरलं. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यात शाळा अपयशी ठरल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला. शाळेच्या गेटजवळच मधमाशांचे पोळे आहे. त्याची माहिती शाळा प्रशासनाला होती, असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, शाळेच्या मुख्याध्यापिका मंजू राणी त्यागी यांनी प्रत्युत्तरात मधमाशांचे कोणतेही पोळे शाळा परिसराबाहेर नव्हते असे म्हटले. सध्या शाळा तात्पुरती बंद करण्यात आली. Representational