Girl Shot Dead in Patna: पाटण्यात 4 वर्षीय मुलीची गोळ्या झाडून हत्या; अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल

वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करणारे तिचे वडील हरी ओम कुमार रात्रीच्या सुमारास घरी परतल्यानंतर ही घटना घडली.

gun shot representative image (PC - Pixabay)

Girl Shot Dead in Patna: बिहारमधील पाटणा (Patna) येथील रुपसपूर भागात रात्री अज्ञात हल्लेखोरांनी एका 4 वर्षांच्या मुलीची तिच्या घराबाहेर गोळ्या घालून हत्या (Murder) केली. पीडित मुलगी तिच्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहत होती. वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करणारे तिचे वडील हरी ओम कुमार रात्रीच्या सुमारास घरी परतल्यानंतर ही घटना घडली. या घटनेनंतर मृत अनुष्काच्या वडीलांनी रूपसपूर पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, ते एमआर म्हणून काम करतात. ते रामजयपाल नगर रोड क्रमांक 4 मध्ये मनोज सिंगच्या घरात भाडेकरू म्हणून राहतात. IGMS मधून काम संपवून ते घरी परतले. त्याच्या हातात दुधाचे पाकीट होते. घरी पोहोचल्यावर त्यांच्या पत्नीने दरवाजा उघडला तेव्हा त्यांची मुलगी अनुष्काही तिथे होती. त्यांनी दुधाचे पाकीट बायकोच्या हातात दिले आणि ते बाईक आत लावण्यासाठी गेले. (हेही वाचा - Hathras Accident: उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये सत्संगादरम्यान चेंगराचेंगरी; अनेक जणांचा मृत्यू, जखमींना रुग्णालयात दाखल)

पत्नीही दूध ठेवण्यासाठी आत गेली आणि मुलगी अनुष्का बाहेरच राहिली. त्यानंतर गोळीबाराचा मोठा आवाज झाला. आम्ही तात्काळ मुलीला जवळच्या खासगी रुग्णालयात नेले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. (हेही वाचा - Bengaluru: सुरक्षा रक्षकाने कॉलेजमध्ये येण्यापासून रोखल्याने तरुणाने मद्यधुंद अवस्थेत केला हल्ला, पाहा व्हिडीओ)

या घटनेबाबत पोलिस स्टेशनचे प्रमुख रणविजय सिंह यांनी सांगितले की, मुलीला गोळी लागली आणि तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मुलीचे शवविच्छेदन करून तिला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. घराभोवती लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे. हल्लेखोर लवकर सापडल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.