पाकिस्तानने दहशतवाद मुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी घेण्याची भारताची मागणी ; 4 फेब्रुवारी 2021 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
पाकिस्तानने दहशतवाद मुक्त वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी घ्यावी असे भारत सरकारने म्हटले आहे. सर्व दिशेने शांततेचा हात पुढे करण्याची वेळ आली आहे. या पाक लष्करप्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांच्या टिप्पणीनंतर भारताने असे म्हटले आहे.
शेतकरी तेथे शांततापूर्वक बसून आहेत. जर त्यांनी शांततेचा मार्ग इतर कोणत्याही मार्गासाठी सोडला तर देशाला एक मोठी समस्या भेडसावेल आणि त्याची जबाबदारी भाजपा सरकारला घ्यावी लागेल. यासारख्या अनेक समस्या आहेत. सत्तेत असलेले लोक असंवेदनशील आहेत असे राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
महाराष्ट्रात आज दिवसभरात 2736 नवे कोरोनाचे रुग्ण आढळले असून 46 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 20,36,002 पोहोचली असून मृतांचा आकडा 51,215 वर पोहोचली आहे.
Toolkit प्रकरण हे अत्यंत गंभीर असून यात काही परदेशी घटक भारताची बदनामी करण्याचे षडयंत्र रचत आहेत असे माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले आहे.
शहापूरकरांच्या पाण्याचा प्रश्न आता लवकरच सुटणार. या तालुक्याला पाणीपुरवठा करणारी भावली धरणाची निविदा येत्या 15 दिवसांत निघणार असे पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.
येत्या 6 फेब्रुवारीला दिल्ली सोडून अन्य सर्व ठिकाणी 3 तासांचा 'चक्का जाम' ठेवण्यात येणार आहे. यात अडकलेल्या लोकांना अन्न आणि पाणी दिले जाईल अशी माहिती भारतीय किसान युनियन राकेश टिकैट यांनी दिली आहे.
आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 358.54 अंकांनी वधारून आतापर्यंत सर्वाधिक 50,614.29 वर बंद झाला आहे. तर निफ्टी देखील 105.70 अंकांनी वाढून 14,895.65 ला बंद झाला आहे.
महाराष्ट्र आणि केरळ मध्ये अजूनही कोरोना रूग्णांची संख्या अधिक आहे. मात्र आता देशाचा एकूण पॉझिटिव्हिटी रेट 5.42% असल्याची माहितीराजेश भूषण, आरोग्य मंत्रालय सचिव यांनी दिली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगाल निवडणुकीपूर्वी भाजपाची रथयात्रा रोखण्यासाठी कलकत्ता उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. पुढील सुनावणी 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे. ट्वीट-
भारतीय स्वातंत्र्य चळवळीत महत्वाची घटना समजल्या जाणाऱ्या चौरी चौरा हत्याकांडाच्या शताब्दी समारंभाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन झाले आहे. ट्विट-
केंद्र सरकारने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांना विरोध करण्यासाठी मागील दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. सरकारने हे कृषी कायदे मागे घ्यावेत अशी मागणी या आंदोलक शेतकऱ्यांनी केली आहे. या आंदोलनाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेलिब्रिटींकडून पाठिंबा मिळत आहे. अमेरिकन पॉप गायिका रिहानानेही शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विट केले आहे. रिहानाचे हे ट्विट बरेच चर्चेत आहे. ट्विटरवर सर्वाधिक फॉलो केल्या जाणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत चौथ्या स्थानी असणाऱ्या रिहानाने ट्विट केल्याने सोशल नेटवर्किंगवर आणि बातम्यांमध्ये या ट्विटची चांगलीच चर्चा आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागाचा 2021-22 या आर्थिक वर्षांचा 2945.78 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प बुधवारी सहआयुक्त रमेश पवार यांनी शिक्षण समिती अध्यक्ष संध्या दोशी यांना सादर केला. गेल्यावर्षीपेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पात केवळ 1 कोटी 29 लाखांची वाढ झाली आहे. दरम्यान, पालिकेचे उत्पन्न कमी झालेले असले तरी विकासकामे आणि प्रकल्पांसाठी के ल्या जाणाऱ्या भांडवली तरतुदीत मात्र यंदा भरघोस वाढ करण्यात आली आहे. पुढील वर्षी फे ब्रुवारी 2022 मध्ये पालिके च्या निवडणुका होणार असल्यामुळे रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी भरघोस तरतूद करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यासमोर पुन्हा नवी अडचण निर्माण झाली आहे. मुंडेंविरुद्ध दुसऱ्या पत्नीने मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना गेल्या तीन महिन्यांपासून चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवल्याचे आरोप त्यांनी केले आहेत. तसेच यामध्ये एक 14 वर्षांची मुलगी असून मुले सुरक्षित नसल्याचे देखील त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्याचबरोबर पोलिसांनी सहकार्य न केल्यास 20 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
पुण्यातील एल्गार परिषदेत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या शर्जील उस्मानी याला कुठेही असला तरी शोधून अटक करु, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विट करत म्हटले आहे. सध्या तो महाराष्ट्राबाहेर असून बिहार, उत्तरप्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करू, असे त्यांनी म्हटले आहे. तसंच त्याच्या आक्षेपार्ह वक्तव्यांची व्हिडिओ क्लिप पोलिसांनी तपासली असून त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.