Karnataka Shocker: कर्नाटकात एकाच कुटुंबात आढळले 4 जणांचे मृतदेह; मृतांमध्ये आईसह तीन मुलांचा समावेश

हे मृतदेह पाहून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Death (Image used for representational, purpose only) (Photo Credits: PTI)

Karnataka Shocker: आज देशभरात दिवाळीचा (Diwali 2023) सण साजरा होत असताना कर्नाटकातून (Karnataka) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कर्नाटकातील तृप्ती नगरमध्ये तीन मुले आणि आईसह एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह सापडले आहेत. मात्र, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

मालपे पीएस हद्दीतील उडुपीमधील नेज्जरच्या तृप्ती नगरमध्ये आई आणि तीन मुलांसह कुटुंबातील चार सदस्यांचे मृतदेह त्यांच्या घरात आढळले. हे मृतदेह पाहून परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक लोकांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. (हेही वाचा - Diwali 2023 Celebration: भारतीय जवानांसोबत दिवाळी सेलिब्रेशनसाठी PM Narendra Modi पोहचले हिमाचल प्रदेशातील Lepcha गावात!)

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. हसीना (48), अफनान (23), अयनाज (21) आणि असीम (14) अशी मृतांची नावे आहेत. सध्या पोलिस या प्रकरणाचा तपास सुरू आहे.