भारतीय लष्कराची पीओकेत कारवाई; पाकिस्तानचे 4 सैनिक ठार
यात 2 भारतीय सैनिक शहीद झाले असून एका नागरीकाचा मृत्यू झाला आहे. या गोळीबाराला प्रत्युत्तर देत भारतीय लष्काराकडून पाकव्याप्त काश्मीर येथील दहशतवादी तळ पूर्णपणे उद्धवस्त करण्यात आले आहेत.
पाकिस्ताने रविवारी सकाळी शस्त्रीसंधीचे उल्लंघन करुन भारतीय लष्करावर गोळीबार केला होता. यात 2 भारतीय सैनिक शहीद झाले असून एका नागरीकाचा मृत्यू झाला आहे. या गोळीबाराला प्रत्युत्तर देत भारतीय लष्काराकडून पाकव्याप्त काश्मीर येथील दहशतवादी तळ पूर्णपणे उद्धवस्त करण्यात आले आहेत. त्याचबरोबर भारतीय सैनिकांकडून पाकिस्तानी लष्करातील 4 सैनिकांना ठार करण्यात यश आले आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद आणखी पेटल्याचे दिसत आहे.
रविवारी सकाळी पाकिस्तानी सैन्यांनी भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्यांना मदत करणयासाठी भारताच्या दिशेने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधी उल्लंघनामध्ये 2 जवान शहीद तर, एका स्थानिक नागरिकाचा मृत्यू झाला. याव्यतिरिक्त इतर 3 गंभीर जखमी झाले आहे. एवढेच नव्हे तर, या गोळीबारात दोन घरे पूर्णपणे उद्धवस्त झाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पाकिस्तानच्या या नापाक कृत्याला प्रत्युत्तर देत भारतीय लष्काराकडून पाकव्याप्त काश्मीर येथील दहशतवादी तळ उद्धवस्त करण्यात आले आहे. त्याचबरोबर भारतीय सैनिक पाकिस्तानचे 4 सैनिकांना ठार करण्यात यशस्वी झाले आहेत. हे देखील वाचा- भारतीय लष्काराकडून पाकव्याप्त काश्मीर येथील दहशतवादी तळ उद्धवस्त
एएनआयचे ट्वीट-
पाकिस्तानकडून करण्यात आलेल्या गोळीबारात भारतीय लष्करासह नागरिकही गंभीर जखमी झाले आहे. या गोळीबारातील जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.