Madhya Pradesh: बोअरवेलमध्ये पडून ३ वर्षाच्या मुलीचा मृत्यू, मध्य प्रदेशातील घटना
शेतात खेळत असताना तीन वर्षाची मुलगी बोअरवेलमध्ये पडली. बोअरवेल 250 फुट खोल होते. घटनेची माहिती मिळताच, बचाव कार्य सुरु झाले.
Madhya Pradesh: मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. शेतात खेळत असताना तीन वर्षाची मुलगी बोअरवेलमध्ये (Borewell) पडली. बोअरवेल 250 फुट खोल होते. घटनेची माहिती मिळताच, बचाव कार्य (Rescue) सुरु झाले. ही घटना 29 जुलै रोजी दुपारी घडली. घटनेनंतर गावात एकच खळबळ उडाली. अथक प्रयत्नानंतर मुलीचा मृतदेह बाहरे काढण्यात आला. (हेही वाचा- पुण्यात विद्यार्थी मुठा नदीच्या पाण्यात पडला; Video व्हायरल)
मिळालेल्या माहितीनुसार, सौम्या शाह असं मुलेचे नाव आहे. सौम्या शेतात शेळीसोबत खेळत होती. त्यावेळीस अचानक ती बोअरवेलजवळ गेली आणि तेथून घसरून खाली पडली. खुप वेळ मुलगी घरात न आल्याने पालकांनी शेतात तीचा शोध घेतला. त्यानंतर ती बोअरवेलमध्ये पडली असल्याची माहिती पालकांना मिळाली. या घटनेची माहिती बचावकार्याला देण्यात आली.
हे बोअरवेल 9 वर्ष जुनं होते. बोअरवेल झाकून होते परंतु पावसाच्या पाण्यामुळे त्याचे झाकण काढण्यात आले होते अशी माहिती कुटुंबातील सदस्यांनी दिली. दुपारच्या 4.30 वाजे पर्यंत बचावकार्य सुरु होते. अथक प्रयत्नानंतर मुलगी मरण पावली. जेसीबीच्या मदतीने बोअरवेलच्या येथे खड्डा खोदून मुलीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेनंतर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. अशीच एक घटना गुजरात येथील घडली. 45 - 50 फुट खोल बोअरवेलमध्ये मुलगा पडला. 15 तासांच्या ऑपरेशननंतर त्याला बाहेर काढण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.