Udhampur Encounter: उधमपूरमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार

उधमपूरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती.

Photo Credit- X

Udhampur Encounter: कठुआ जिल्ह्यात आज लष्कराचे (Indian Army) विशेष दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी केलेल्या कारवाईत तीन दहशतवाद्यांच्या खात्मा केला. त्याबाबतची माहिती एनडीटीव्ही या वृत्तसंस्थेने दिली. गेल्या काही दिवसांपासून भारत-पाकिस्तान सीमेवर दहशतवाद्यांकडून घुसखोरीचा प्रयत्न होत आहे. त्याला भारतीय लष्कराकडून जोरदार प्रत्यूत्तर दिले जात आहे. आजही अशीच एक घटना उधमपूर(Udhampur) येथे घडली. लष्कराने तेथे कारवाईत 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.(हेही वाचा:Jammu And Kashmir: जम्मू-काश्मीरच्या नौशेरामध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला, 2 दहशतवादी ठार )

या ऑपरेशनमध्ये सामील असलेल्या युनिट्समध्ये लष्कराच्या 1 पॅरा, 22 गढवाल रायफल्स आणि केंद्रशासित प्रदेशातील पोलिसांचा स्पेशल ऑपरेशन ग्रुप सामिल होता. जम्मू-काश्मीरमध्ये 18 सप्टेंबरपासून तीन टप्प्यात मतदान होणार आहे. जम्मू-काश्मीरमधील अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने केलेल्या बेछूट गोळीबारात आज सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान जखमी झाला.

भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेचे रक्षण करणाऱ्या बीएसएफ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले की, भारतीय सैन्य दल हाय अलर्टवर आहेत. भारत-पाकिस्तान सीमा अंदाजे 3,323 किमी पसरलेली आहे, जी दोन देशांना वेगवेगळ्या स्तरांवर तणाव आणि सुरक्षा आव्हानांसह विभाजित करते. भरतीय सैन्य दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.

3 दहशतवादी ठार

2 दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधील नौशेरा शहरातील लाम भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. या चकमकीत लष्कराच्या जवानांनी 2 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. शनिवारी आणि रविवारी मध्यरात्री झालेल्या घुसखोरीविरोधी कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिसांना मिळालेल्या गुप्तचर आणि संभाव्य घुसखोरीच्या प्रयत्नांच्या माहितीच्या आधारे भारतीय लष्कराने कारवाई सुरू केली होती.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif