Kulgam Encounter: जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये सुरक्षा दलाला मोठे यश; चकमकीत 3 दहशतवादी ठार

त्यानंतर जवानांनी शोधमोहीम सुरू केली. शोध सुरू असताना सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक झाली.

Encounter प्रतिकात्मक प्रतिमा

Kulgam Encounter: जम्मू-काश्मीर (Jammu and Kashmir) च्या कुलगाम (Kulgam) मध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. मंगळवारी, 7 मे रोजी सुरक्षा दलांनी चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार (Terrorists Killed) केले. कुलगामच्या रेडवानी पाइन भागात गेल्या 12 तासांपासून दहशतवाद्यांशी चकमक सुरू होती. दहशतवादी कुठून आले, कोण आहेत? हे अद्याप कळू शकलेले नाही. परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे.

या भागात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी, 6 मे रोजी रात्री 11:30 वाजता सुरक्षा दलांनी कुलगामच्या रेडवानी भागाला वेढा घातला. त्यानंतर जवानांनी शोधमोहीम सुरू केली. शोध सुरू असताना सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक झाली. दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी स्वत:च्या रक्षणासाठी दहशतवाद्यांना प्रतिउत्तर दिले. (हेही वाचा -West Bengal Blast: हुगळी येथे मुले खेळत असलेल्या तलावाजवळ भीषण स्फोट; एक ठार, दोघे गंभीर जखमी (Watch Video))

मंगळवारी सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. दहशतवाद्यांच्या मृतदेहांची अद्याप ओळख पटलेली नाही. 28 एप्रिल रोजी उधमपूर जिल्ह्यातील बसंतगढ येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात व्हिलेज डिफेन्स गार्ड (VDG) मोहम्मद शरीफ यांना आपला जीव गमवावा लागला होता. यानंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना पकडण्यासाठी परिसरात शोधमोहीम राबवली होती. दहशतवाद्यांच्या दोन गटांचा माग काढण्यासाठी एजन्सींनी त्यांच्या शोध मोहिमेची व्याप्ती कठुआ जिल्ह्यात वाढवली होती. (वाचा - Ahmedabad Schools Bomb Threats: दिल्लीनंतर आता अहमदाबादमधील शाळांना ईमेलद्वारे बॉम्बची धमकी; पोलिसांकडून तपास सुरु)

चोचरू गाला हाईट्सच्या दुर्गम पनारा गावात ही चकमक झाली. 29 एप्रिल रोजी अतिरिक्त पोलीस महासंचालक (जम्मू प्रदेश) आनंद जैन यांनी सांगितले की, अलीकडेच सीमेपलीकडून घुसखोरी केल्यानंतर दहशतवाद्यांचे दोन गट या भागात उपस्थित होते.