Andhra Pradesh Shocker: विशाखापट्टणम येथे 23 वर्षीय फोटोग्राफरची हत्या, दोन आरोपींना अटक
आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे एका २३ वर्षीय फोटोग्राफरची कॅमेऱ्यासाठी दोन जणांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Andhra Pradesh Shocker: आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे एका 23 वर्षीय फोटोग्राफरची कॅमेऱ्यासाठी दोन जणांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डॉ बीआर आंबेडकर कोनासीमा जिल्ह्यातील रावुलापलेमजवळ 26 फेब्रुवारी रोजी हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर मुलाचा मृतदेह पुरला होता. फोटो काढण्याच्या बहाण्याने पीडितेला साई पवन कल्याण येथे बोलावून घेतले त्यानंतर त्याची हत्या केली. (हेही वाचा- अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या, आरोपी पतीला अटक)
मिळालेल्या माहितीनुसार, साई कल्याण असं मृत तरुणाचे नाव आहे. कुटुंबियांनी मुलगा बेपत्ता झाल्याने तक्रार नोंदवला. पोलिसांनी या प्रकरणी तपासणी चालू केली. कॉल डिटेलच्या आधारे पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आणि गुन्ह्याची कबुली दिली. कॅमेऱ्यासाठी त्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. षण्मुख असं मुख्य आरोपीचे नाव आहे. षण्मुख याने पोलिसांना सांगितले की,साई कल्याणला फोटोग्राफीसाठी बोलावून घेतले होते. राजमहेंद्रवरम रेल्वे स्थानकावर आल्यानंतर त्याला षण्मुख आणि त्याच्या मित्राने कारमधून घेऊन गेले.
त्यांच्या प्लॅनिंगनुसार, त्याला एका निर्जन स्थळी घेऊन गेले. त्याच्या रावुलापलेमजवळ गळा दाबून हत्या केली आणि त्याला जमिनीत पुरला. त्याचे सर्व साहित्य कॅमेरे आणि उपकरणे फेकून त्यांची तोडफोड केली. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. कल्याणच्या हत्येनंतर कुटुंबियावर दुखाचा डोंगर कोसळला.