Indore News: अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या, आरोपी पतीला अटक

इंदौर येथे एका पतीने पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

Indore News: अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीची हत्या, आरोपी पतीला अटक
Representational image (Photo Credit- IANS)

 Indore News:  मध्य प्रदेशातील इंदौर येथे एका पतीने पत्नीचा स्कार्फने गळा आवळून खून केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. इंदौर पोलिसांनी आरोपी पतीविरुध्दात खूनाचा गुन्हा दाखल करत अटक केले आहे. या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे.पोलिसांनी महिलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. राहत्या घरात पत्नीची हत्या करून आरोपी पतीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. (हेही वाचा- घरगुती भांडणातून पत्नीची हत्या; हॉस्पिटल मध्ये आत्महत्या केल्याचा बनाव रचणारा आरोपी पती अटकेत)

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने पत्नीला मारल्यानंतर पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. घरच्या पहिल्या मजल्यावरून उडी मारल्याने शेजारच्यांनी पाहिल्यानंतर पतीवर संशय आला. पळून जाण्याच्या प्रयत्नात त्याला पायाला दुखापत झाली आणि पोलिसांनी त्याला पकडले. पकडल्यानंतर आरोपीची चौकशी करण्यात आले आणि आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली  नयना सौदे असं मृत महिलेचे नाव आहे. बियाबानी मालगंज येथील रहिवासी आहे. तर आरोपीचे नाव मिलींद सौदे असं नाव आहे.

मिलिंद आणि नयना दोघे ही मुंबईत राहायचे. काही दिवसांपासून ते इंदौर येथे राहायला आले. आरोपीने पत्नीच्या अनैतिक संबंधावर संशय घेतला होता. ती सतत फोनवर बोलायची आणि यावरून घरात वाद होत असायचा. त्यांच्यात जोरदार वाद झाला आणि त्याने रागाच्या भरात पत्नीचा स्कार्फने गळा दाबून खून केला. तीचे सासरे जेव्हा घरी आले तेव्हा नयना बेशुध्द अवस्थेत दिसली. त्यांनी तिला रुग्णालयात नेले असता तिला मृत घोषित करण्यात आले. तळमजल्यावर कुलूप असल्याने आरोपीने तेथून पळ काढण्यासाठी पहिल्या मजल्यावरून उडी मारली. आरोपीच्या आईने सांगितले की, मिलिंद मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होता आणि काही दिवसांपूर्वी हे दाम्पत्य भोपाळ आणि उज्जैनला जाऊन उपचारासाठी इंदूरला आले होते.

(The above story first appeared on LatestLY on Mar 04, 2024 10:39 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).