IPL Auction 2025 Live

UP Shocker: आग्रा येथील ब्रह्मा कुमारी आश्रमात 2 बहिणींची गळफास लावून आत्महत्या; सुसाईड नोटमध्ये 4 कर्मचाऱ्यांना धरले जबाबदार

बहिणींनी त्यांच्या मृत्यूसाठी आश्रमातील चार कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे.

UP suicide Case (PC - Twitter)

UP Shocker: उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ब्रह्मा कुमारी आश्रमात (Brahma Kumari Ashram) शुक्रवारी रात्री दोन बहिणींनी आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी बहिणींनी आश्रम ग्रुपवर व्हॉट्सअॅपवर सुसाईड नोट पाठवली. मृत्यूची बातमी समजताच मृताच्या कुटुंबीयांनी रात्रीच आश्रमात धाव घेतली. या मुली त्यांच्या खोलीतील पंख्याला साडीने लटकलेल्या अवस्थेत दिसल्या. बहिणींनी त्यांच्या मृत्यूसाठी आश्रमातील चार कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली आहे.

एकता (37) आणि शिखा (34) अशी या बहिणींची नावे असून, त्या जगनेर शहरातील रहिवासी आहेत. या दोघी 2005 मध्ये आश्रमात रुजू झाल्या. त्यांचा भाऊ सोनूने सांगितले की, शुक्रवारी रात्री 11 च्या सुमारास ब्रह्मा कुमारी आश्रमातील बहिणीकडून त्याच्या व्हॉट्सअॅपवर सुसाईड नोट मिळाली. त्यांनी आश्रमात धाव घेतली असता त्यांच्या बहिणी आश्रमात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत दिसल्या. (हेही वाचा - Stampede at Surat Railway Station: गुजरातमधील सुरत रेल्वे स्थानकावर चेंगराचेंगरीत 1 ठार, अनेक जखमी)

आश्रमात आत्महत्या करण्यापूर्वी बहिणींनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. एका बहिणीने तीन पानांची चिठ्ठी तर दुसऱ्या बहिणीने एका पानाची सुसाईड नोट लिहिली. ही सुसाईड नोट आश्रमाच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर फॉरवर्ड करण्यात आली होती. त्यांनी चिठ्ठीत आत्महत्येसाठी आश्रमातील चार कर्मचाऱ्यांना जबाबदार धरले असून कर्मचाऱ्यांना आसाराम बापूंप्रमाणे जन्मठेपेची शिक्षा द्यावी, असे आवाहन केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, योगीजी, आसाराम बापूंप्रमाणे त्यांना जन्मठेपेची शिक्षा द्या. त्यांनी चार कर्मचार्‍यांवर फसवणूक आणि पैसे उकळण्याचा आरोप केला आहे.

याशिवाय अनैतिक कामात त्यांचा सहभाग असल्याचा आरोपही या मृत बहिणींनी केला आहे. एसीपी खैरागढ म्हणाले की, चारही आरोपी आग्रा बाहेरील आहेत आणि चारपैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील उर्वरित दोन आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी पथके तयार केली आहेत.