Bihar Shocker: ग्राम पंचायतीच्या सुनावणीदरम्यान 2 जणांची गोळ्या घालून हत्या, बिहारच्या खगडिया जिल्ह्यातील घटना
रोहियामा (Rohiyama) गावात रविवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे.
बिहारच्या (Bihar) खगरिया (Khagaria) जिल्ह्यातील ग्राम पंचायतीच्या (Gram Panchayat) सुनावणीदरम्यान दोन जणांची गोळ्या घालून हत्या (Murder) करण्यात आली. रोहियामा (Rohiyama) गावात रविवारी संध्याकाळी ही घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. दोन गटांमधील आगामी पंचायत निवडणुकांशी संबंधित प्रकरण निकाली काढण्यासाठी पंचायतीचे आयोजन करण्यात आले होते, असे बेलदौर पोलिसांनी (Beldaur Police) सांगितले आहे.
किशुनदेव चौधरी आणि हरीबोल अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, ग्राम पंचायतीच्या सुनावणीदरम्यान दोन गटात भांडण झाली. त्यावेळी अचानक काही लोकांनी अंदाधुंद गोळीबार केला. ज्यात किशुदेव यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, हरीबोल यांचा रुग्णालयात घेऊन जात असताना मृत्यू झाला आहे, अशी माहिती समोर आली आहे. हे देखील वाचा- Ahmedabad Shocker: औषधांसाठी पैसे मागितले म्हणून पतीकडून पत्नीला बेदम मारहाण, गुन्हा दाखल
बालदौर पोलीस स्टेशनचे एसएचओ संतोष कुमार म्हणाले की," किशुनदेव चौधरी यांच्या छातीत आणि पोटाला गोळी लागल्याने त्यांच्या जागीच मृत्यू झाला आहे. तर, हरीबोल यांना जवळच्या रुग्णालयात घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेतील हल्लेखोरांची ओळख पटली असून त्यांना लवकरच तरुंगात टाकले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.