Ballia Shocker: 7 वर्षाच्या मुलीवर दोन अल्पवयीन मुलांकडून बलात्कार; उत्तर प्रदेशमधील बलिया येथील घटना
शुक्रवारी ही घटना घडली. मात्र, मुलीने तिच्या कुटुंबियांना याबाबत सांगितल्यावर रविवारी घटनेचा उलगडा झाला.
Ballia Shocker: देशभरात अल्पवयीन मुलींवर होत असलेल्या अत्याचाराच्या घटनामध्ये वाढ होत आहे. नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेत उत्तर प्रदेशातील बलिया जिल्हा मुख्यालयातील कोतवाली भागात (Uttar Pradesh)दोन अल्पवयीन मुलांनी 7 वर्षाच्या मुलीवर बलात्कार (Rape) केला. आज रविवारी ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी मुलांनी मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून शुक्रवारी दुपारी बलिया (Ballia) शहरातील कोतवाली परिसरातील एका निर्जण स्थळी नेले. आरोपी मुलांचे वय सात ते आठ वर्षांच्या दरम्यान असल्याचे सांगण्यात येत आहे. (हेही वाचा:Ujjain Rape Case: आधी दारू प्यायला लावली, मग रस्त्याच्या मधोमध केला पीडितेवर बलात्कार; मध्य प्रदेशातील उज्जैनमधील घटना, आरोपीला अटक )
मिळालेल्या माहिचीनुसार, शनिवारी पिडित मुलीची प्रकृती बिघडल्याने तिचे कुटुंबीय तिला जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले. तिची तपासनी केली असता तिच्यासोबत अशी घटना घडल्याची माहिती मिळाली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने पोलीसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी रुग्णालयात दाखल होत. मुलीची विचारपूस केली आसता सर्व घटनेचा उलगडा झाला. डॉक्टरांच्या सल्ल्याने पिडित मुलीला चांगल्या उपचारासाठी वाराणसीला नेण्यात आले आहे.
मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून शनिवारी रात्री उशिरा दोन्ही मुलांविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) आणि लैंगिक अत्याचारांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याचे एसपी म्हणाले.